1८8006 ४//७४5 )२८६॥४(/1८६०

()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२.२

0) 192524

२०7१०० हि ॥४5७-/॥५]

09141. ए॥॥॥-7२१७॥1'४ 11ार१

(381 1४० डा ९९८6९५५101 1४०. टी,0 ह| ५65 ८-५ तप्त 0" त्त 210 , द१ दप. गूः > 3 302१३५ १॥%$ ॥708। गृ ७0णा भ0पाच ७९ 611९0 01 ७०९0८ ॥10 0812 139 1131100 ९10७.

ई&व्ग््ुव्ट

ललित निबंध

देवीदास बागूल

सरस्वती प्रकारान : पुरणे

मूल्य दोन रुपये

प्रकाराक :

सो. सिंचु वझे,

सरस्वती प्रकादान,

४१४ सदारदिव पेठ, पुणें

प्रथमादृत्ति : बलिप्रातिपदा, ठाक १८८१

(2) देवीदास बागूल, पुणे

सुखपष्ठ : दत्ता महाबळे*्वरकर

एकमेव विक्रेते : इनामदार बंच, ९९१ सदाशिव पेट, पुणें

मुद्रक :

चिं. ग. वझे,

साधना प्रेस,

४३२०-३१ दानिवार पेठ, पुरणे

मला समजून घेणारे प्रिय राजा कडिळे

यांस ---

श्र

शेशवदूत

अहल्योद्धार

बोलायर्चे कुणाशी ?

विकत घेतलेलीं माणसें

अशारीरिणी

कुंतीचं मागणें

दूर

पंचांगांत नसलेली यात्रा

अ(न) पेक्षित आक्रोश जेव्हां मोठे लहान होतात....

नवी शाळा

ज्ञानेश्वरांची मित्रकल्पना

अपवादाचा बोघिवृध्ष

सुस्वागतम्‌ नवागतम्‌ !

श्री, देवीदास बागूल यांच्या ठललित-निबंधांचा हा सुन्दर संग्रह म्हणजे मराठी ललित साहित्याच्या प्रांगणांतील त्यांचं पहिलं पाऊल, अंतरंगाचं खरंखुर उत्कट सोहार्द आणि त्यामुळेच लाभलेली सहज- सुन्दर रसाळ शब्दकळा, या दोन्ही गुणविदोोषांमुळें त्यांचे हे भावपूणे ललितनिबंध प्रथम साधर्नेत वाचले, तेव्हांच त्यांचे वेगळेपण मनांत भरलं होतं. “' बागूलांचा साधनेतील लेख वाचलात का?” असं त्या वेळीं मी अनेकांना आवजून विचारलं होते आगि या नवागताची विचारपूस केली होती, असं आजहि आठवतं, आज त्यांचा हा पह्िला-वहिला संप्रहू रसिकांपुढे येतांना, त्याची वाटचाल अधिक सुकर व्हावी यासाठीं बडिलकीच्या नात्यानें त्यांना आक्यीवौद देण्याचं आणि त्यांचं मनापासून सहषे स्वागत करण्याचें काम माझ्याकडे आळ आहे---आणि मी तें अत्यंत मनःपूर्वक करतो.

गेल्या कांही दशकांमध्ये मराठी साहित्य सवीगानं विकसित झालं असलं तरी मराठी ललितनिबंध ही चीज मात्र कांहीही उपेक्षणीय ठरली होती. गंभीर प्रकृतीचा वैचारिक निबंध है या वाढ्ायप्रकाराचं सनातन स्वरूप असलं, तरी त्याची दुसरी खेळकर, लालित्यपूर्ण

[७ ]

बाजू मराठी साहित्यांत पुरेशी स्थिरावू शकली नार्ही, असं गेल्या कांहीं बषोमध्यें वाद लागलं होते. व्यक्तिमत्वाचा रसरत्यीतपणा, तीज संवेदनाक्षमता, जीवनांतील प्रत्येक अनुभूति उत्कटपर्णे घेण्याची मनोवृत्ति आणि या साऱ्यांला दाब्दाकित करणारी नाजूक शब्दकळा या सर्व गोष्टी खऱ्याखुऱ्या ललितनिबंधकाराला अत्यावश्‍यक असल्यानेच कदाचित्‌ या क्षेत्रामध्ये पुरेस समाधानकारक लिखाण होत नसावं. विनोबांचे लेख जसे याला अपवाद, तसेच विन्दा करन्दीकरां- सारख्या अस्सल कबीरने ' स्पद्चांच्या पालवी 'मर्ध्ये अन्तभूत केलेले, दुर्गा भागवतांचे ' कतुचक्रां तील किंवा नानासाहेब गोऱ्यांचे डाली 'तील काव्यमय ललितलेखहि अपवादभूत होत. श्री. देवीदास बागूल यांचे या संग्रह्मंत आलेले कांद्दी लेख या निकषावर निःसंशय उतरतात यांत शंका नाही,

या संग्रहांतील पहिले एक-दोन लेख वाचीत असतांना मूर्तिमंत काव्य इथं चुकून गद्यांत अवतरलं आहे, असं वाटण्याइतकी काव्यात्मता आणि उत्कट समरसता प्रत्ययास येते. निसगांच्या सानिध्यांत आणि सन्तांच्या स्मृतीत बागूलांची प्रतिभा जशी बहरते आणि रंगते, तितकी ती इतरत्र क्वचितच रंगते. * अहल्योद्धार * या पहिल्याच काव्यमय आणि भावपूर्ण लेखामध्ये, वषाकरतूमध्ये नयन- सुख आणि स्पर्शसुख देणाऱ्या निसर्गाच्या विविध बारकाव्यांचं आणि विभ्रमांचं जे अत्यंत मनोज्ञ चित्रण त्यांनी केळे आहे ते खरोखरच अविस्मरणीय वाटतं. पंचेंद्रियांच्या साहाय्यानें न्याहाळलेला, स्पार्शीलेला, आस्वादिलेला निसर्ग त्यांनी इथ रसिकांपुर्ढे अत्यंत हळुवार हातार्ने साकार केला आहे. या तन्मयतेमर्ध्ये ' रंगांच्या दुनिर्येतील तो एक स्वप्न-प्रवास होता ? यांसारखी काव्यमय सूत्रबार्क्ये ते नकळत लिहून जातात आणि त्यांचा विसर वाचकांना सहजासहर्जी पडत नाहीं.

[८]

निसगोइतकीच तद्रूपता बागूलांनीं आपल्या आवडत्या संतांच्या वाड्य़यीन स्मृतीमध्ये अनुभवली आहे, याचं प्रत्यंतरहि इथं पानोपानी मिळतं. ' ज्ञानेश्वरांची मित्रकल्पना ! हा या संम्रहांतील लेख त्यांच्या सन्तवाड्य़याच्या परिश्ीलनाचा जशी साक्ष देतो, तक्षीच या अलोकिक संतामधील, लौकिकांत आढळणारा भावनेचा झराहि त्यांनी पाहिला असल्याची खूण पटवितो. : बोलायचें कुणाशी £* या या संग्रह्मंतील दुसऱ्या सुन्दर लेखामध्ये ज्ञानेश्वरांच्या ज्या अबीट गोडीच्या ओवीचा उलेख त्यांनीं सहजगत्या केला आहे, ती कोणत्याहि रसिकाला एक मधुर हुरहूर लावील यांत शंका नाही.

या लेखाप्रमार्णेच या संग्रह्मंतीलळ इतर कांडी लेखांमर्ध्ये बागूलांच्या हळव्या, उत्कट, संवेदनाक्षम व्यक्तिमत्वाची चाहूल जागोजार्गी लागते, स्वतःबद्दल प्रत्यक्षपर्ण लिहितांनाहि स्वतःच्या व्यक्तिमत्वा'चे अनेकविध नालुक तरंग लेखनांत उमटविर्णे---सहजगत्या उमटविर्णे- हें सच्च्या कलाकारालाच साघतें. तं बागूलांना मोठ्या प्रमाणात साघर्ले आहे. संतवाणीमर्थ्ये त्यांची दाब्दकळा सुस्नात झाल्याने, तिच्यावर पक आगळेच मांगल्य चढले आहे. ' लावण्यमयी ' हें विशेषण ते नकळत कल्पनेला लावून जातात आणि एक साकार रेखीव मूर्ति आपल्या मनश्चक्षूसमोर उमटून जाते. अतरींचे सौहार्द आणि रसाळ शब्दकळा या दोन्ही गुणांचे सानिध्य लाभल्यार्ने बागूलांच्या अनेक लेखांना एक आन्तरिक गोडवा लाभला आहे, मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो.

--7 बि. दृ. घाटे

अहल्पोद्ार

मन कितीहि कष्टी आणि विषण्ण असलें तरी परिसाच्या स्प्षीने लोखंडाचे निमिषांत सुवर्ण व्हावे तडूत निसगदर्शनानें मनावरील विषण्णतेचा गंज झडून जातो आणि तनामनावर आनंदरसाची सुवर्णकळा चढते, मनांतली प्रसन्नता चेहऱ्यावर उमटून येते. नेत्र उतपुलु होतात, अधर स्मिताच्या प्रेणेने विलग होतात. ह्या निसगेदर्शनाचाहे अनेक अवतार आहेत. मात्र पंचेद्रियां- पैकी प्रलेकाला आवाहन करण्याचे सामथ्ये निसर्गाच्या सहा अवतारांमध्ये फक्त वर्षा-अवतारांतच आहे, असें मळा वाटतें. तसें पाहिले तर प्रत्येक क्रतःचे कांहींतरी व्यवच्छेदक लक्षण असतेच ! त्या व्यवच्छेदक टक्षणाच्या गौरवांत त्या त्या कालांत प्रत्येक क्रतूला कहार्णांच्या चाली * वर श्रष्ट ठरावळे जाते. अगदीं रुक्ष असणाऱ्या ग्रीष्माचेसुद्धां ' ग्रीष्म माझिया दारीं आला, ग्रीष्म माझिया दारीं! ,असें खागतगीत आळावले जातें.

"4 *२*१%१%९-.१.२--२११३२-.३२-..१२१-५-.-.4५१२ १२-१५ २१-२३-५.-०५२०-.५4--२११२१-44-५-१-१५4-२ १-५ २-०-१५-०-०५१-०-२-९-९-९-५९-९-६-१-५-१-५ 1 शा वदुत

मात्र वपोक्रत्शिवाय इतर क्रतु पंचेद्रियांपैकी कोणत्या तरी एकाच इंंक्ष्याला सोदर्यविश्वाच्या एकेका पैठूर्चे दर्शन घडवितात, शरदांतील रूपसौदयांचा सोहळा, हेमंतांतील स्पशीसुखाची अनुभूति, वसंतांतील परिमळाचा आल्हाद इत्यादि पृथक्‌ पृथक सोदयदर्शनानें त्या त्या इंद्रियद्वारां मनाची सोंद्यतृष्णा काहीं अंशींच तृप्त होत. परंतु वषीक्रतु मात्र एकटाच सवे इंद्रियाचे एकसमयावच्छेदेकरून समाधान करतो, वषीक्रतृतीळ निसर्गदर्शनाने डोळ्याला रूपाची खाणी उघडळेळी दिसते, कणोळा नादब्रह्माची चाहूल ऐकं येत. त्वचेला स्परीसुखाची भट होत आणि प्राणेद्रियाळा परिमलाचा वेव लागतो, रसनेळा नर्वींच गोडी लाभते, सगळ्या पंचद्रियांतच प्राणतत्त्व उमलते,

परवां जेव्हां चाळीसगांव स्टेशनवरून वषीकाळीन पहिळा-वहिळा सूर्यादय पाहिला, तव्हा ग्रीष्माने शुष्क झालेली इथं पुन्हां रसरसून हिरवी झालीं, प्रेमळ व्यक्तीच्या सहवासांत संकोच गळून पडावा त्याप्रमाणे 'आंतीळ विषण्ण वृत्ति! गळून पडल्या. प्वरेकडील क्षितिजा- लगत प्रकाशब्रह्माचा आत्माविष्कार होत होता. त्या आत्माविष्कारांत नवथर जलाद्र भेघ न्हाऊन निघाळे, ते अरुणकाळीन प्रकाशफूलाहे निळसर जलदांच्या सहवासांत खुदकन हंसल, त्या हास्यांत त्या प्रकार- फुलाचें सप्तरंगी अंतरंग प्रगट झाल, त्याचे पडसाद मेघांच्या मुखावराह्दे उमटले. आणि अंतरिक्षांत सप्तवर्णांचें एक संवादी संमळनच भरलें,

त॑ रंग-संमळन किती बिभ्रमशीळ होते |! प्रिय व्यक्तीशी संभाषण करतांना तरल मुखावरीळ भाव क्षणाक्षणाला बदलावेत, त्याप्रमाणें अनेकविध भेघाकृतीवर्रीळ रंगछटांत बदल होत होत. आणि त्या

शेहबदृत

रंगछटाहे अशा अलगद बदलत होत्या कीं, रंगाची एक छटा संपली केव्हां आणि दुसरी सुरू झाली केव्हां ह्याचें भानहि उरू नथे. रंगांच्या दुनि्यतील तो एक स्वप्न-प्रवास होता !

आकाशांत इंद्रवनूचे रंग सांडळे होते, तर भूर्मावर हरित तृणाचे दशावतार विलसत होते, शेतांच्या मध्यभागीं कोवळ्या गवतांचा पिंवळसर हिरवा, शेतबांधावरीलळ तृणाचा निळसर हिरवा, प्रौढ तृणाचा निव्वळ हिरवा, कटिशिखांत पलछुवित झालेल्या वृक्षांचा काळसर हिरवा; अशा कितीतरी हिरव्या कळा रसरसून आल्या होत्या. तशांतच भेघांच्या करसंपुटांतून स्रवणारे ऊन तल्या हिरवळीवर पडल्यानें त्या हिरव्या कळांना विलक्षण तजेळा आला होता. जणूं कांहीं त्या हिरवळीच्या रूपाने भूमीचे ' भेणाहुनी मऊ! असलेलें संत-अंतरंगच प्रकट झा& होतें ! ग्रीष्म क्रतूंत हीच धरा किती रुक्ष आणि भकास वाटत होती | ठायी ठायीं पडलेल्या भगांनीं तिच्यावर बृद्धत्वाची अवकळा चढली होती, परंतप ग्रीष्मानें तिच्यांतठा सगळा रसच शोषून घेतला असल्याकारणानें तिच्या ठायीं मार्दवाचा कवी पुन:ःसंभव होइल कीं नाहीं, ह्याची कल्पनाहि करवत नव्हती, परंतु तरीह्वि ती घधरा--धारण करणारी---असल्यानें बर्षाक्रतऱ्चा पदस्पद्दी होतांच तिचा ' अहल्योद्वार! होतो आणि 'का भूमीचे मार्दव सांगे कोभाची लवलव ! ह्या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे तिच्यांतळी सारी मूदुता हिरवळीच्या रूपार्ने बाहेर प्रकटते. कताचा पुन्हां एकदां प्रत्यय येतो,

ह्या हिरवळीचे सौंदये जितकें दशेनांत आहे, तितकेच तें तिच्या स्पशांतहि आहे. ' हिरवेंगार! हा सामासिक शाब्द ल्या

खे शेदावदूत

अविभाज्य संवेदनांचे प्रतीक आहे. गार ! ह्या संशेनें स्पर्शेंद्रियाळा साद घातली जाते. आणि त्या मृदुळ तृणाळा स्पशे करतांच त्वचेवर रोमांच उठतात, ' मातीच्या पुत्राचे ! मातीशी नाते जोडळें जातें. हरित तृणाच्या कुशींत अंग झोकून दिलें म्हणज, अपार स्पशेसुख होते. खरें म्हणजे ह्या वर्षाक्रतंत स्पर्शासौदर्याची एक इंद्रभुवनगुह्दाच उघडली जाते, पारिजातकाची फुळें, जाईची फुलें ह्यांच्या सुगंधा- बरोबरच त्यांच्या स्पशांचा अनुभव घेतला नाहीं, तर त्यांपासून होणाऱ्या आनंदाला पणेताच येऊं शकत नादीं. याहिपेक्षां आकाशाच्या विशाळ अंतःकरणात स्रवणाऱ्या त्या अमित जीवनधारांनीं माझ्या अंगाला कुरवाळले म्हणजे, माझा देहच स्पशार्चे एक सुंदर टपोरे फूल बनतो. | वरषाक्रतंत अनेक सुगंधी फुळें उमलत असलीं तरीह्वि वर्षाक्रतूळ सुगंधाच्या बाबतींत मी जे राजपद बहाळ करतो त॑केवळ रात- राणीमुळें. सुगंधी फुलें म्हटळीं म्हणजे वासंतिक मोगरा, शारदीय गुळाब, व्षोकालीन पारिजात, जाई, चांफा ह्यांची नावेंच प्राथम्यानें प्राणेद्रियाळा सामान्यत; स्मरतात, कारण, तीं सवे सुबोव आहेत. त्यांच्या सुगंधाबरोबर त्यांचा पार्थिव आकाराहि चर्मचक्षंना भासमान होतो. त्यांची सोरभप्रतीति ती पुळे पार्थिव आक्रारानें आपल्या करपलुवांत आल्याशिवाय होत नाही, परंतु योजनगंधा रातराणीचा सौरभ मात्र अरूपाचे पंख ठेवून माझ्यापर्यंत दरवळत थेतो, दिवसभराच्या घबडग्याने आपण शिजून निघालेले असतां. त्या गोंधळांत वृत्तीची संवेदनक्षमता देशोधडीला लागते. आणि सांजकाळीं पाहावे तो मन कुठेतरी कोपर्‍्यांत संकोचून बसलेछे

शेशवदूत ष्‌

दिसते. आंबळेल्या शरिरानें पोटांत ' चार घांस ! ढकलले म्हणजे अवयव सुस्तावतात, परंतु मन अखस्थच असतें. तोंच बाहेरून पावसाळी गारवा साद घाळतो आणि मनांतील मश्याफिर जागा होतो, कळत पाय घराबाहेर पडतात,

नुकताच पाऊस पडून गेळेळा असतो, विजेरी प्रकाशाच्या प्रदेशांतील निथळणारी धरित्री ओलेल्या ख्रीप्रमाणे मंथर झालेली असते. तिचे धुळीचें वस्न तिच्या अंगाला कसे चापचोपून आणि चिंब होऊन चिकटटेळे असतें | श्वासांत गारवा असतो. पण नुसताच गारवा नसतो, तर त्या गार श्रवासांतन एका तरल सुगंधाची माया मरठेळी असते. कोठून येतो तो सुगंध £ खरें म्हणजे, त्या क्षणीं मुळीं हा भौगोलिक प्रश्न मनांत उद्भवतच नाहीं. उद्भव होतो तो फक्त आते ओढीचा ! त्या सुगंधाने मनांतळी अपार्थिवतेची ओढ चाळविळी जाते. अंतमुख मन कसळे तरी गूढशोधन करूं लागते, हळूं हळूं सगळे स्थिरचरच सुगंधमय वाटू लागते, दशदिशांतून साद घाढीत प्रत्येकाला आलिंगन देणाऱ्या त्या दिगंबर सुगंधामुळें-

तो मज गमले विभूति माझी

स्फुरत पसरली विश्वामाजी ह्या अनुभूतीचा प्रकाश माझ्या मनांत पाझरतो. त्या प्रकाशांत मला : मी ! सांपडतो. तत्‌क्षणीं त्रिखंडाळा अर्थ येतो, प्रत्येक बस्तु बोलकी होते. पिंपळपानें सतार छेडतात. फांद्या टिपऱ्या खेळतात. वारा शीळ घालतो. पागोळ्या जलतरंग वाजवितात, छोटे छोटे ओहोळ खळखळून हंसतात, डोंगरखांद्यावरून उडी मारणारे जलप्रवाह

द्‌ शोशवदूत

पायथ्याच्या खडकावरीळ नगारा बडवितात, वळवाची सर गिटार- वाद्याच्या तारा छेडून जाते.

तेव्हां उरतात फक्त कणे-आणि त्या कणांद्वारें नादब्रह्माला सामावून घेणारें खराते मन ! त्यावेळीं खर हेंच एक सत्य वाटतें. सगळ्या चराचरांतन त्या खरसत्याचे पडसाद ऐकूं येतात,

वषोक्रतूच्या ह्या पदन्यासानें रस, रूप, गंध, स्पशे, नाद ह्यांची फुळें पथ्वीच्या अंगप्रत्यंगीं फुलतात, त्या पंचविध फुळलांमुळें माझ्या पंचेद्र्यांचा उद्धार होतो, आणि तीं इंद्रिये त्या त्या सौदयांचे कळछा भरभरून मनावर शांतीचा अभिषेक करतात. चैतन्याचा संदेश पोचवितात.

परंतु ह्यामुळेच सारें बिनसते !

नाकासमोर दिसणाऱ्या दगडी रस्त्याने चालणारे मन पार उधळतें. काळकामवेगाची सस्कृति झुगारून ते खुशाल वपोऊतूचीं सांडळेलीं प्रसादर्चिन्हे घुंडाळीत शरदाच्या चांदण्यांतन, हेमंताच्या दंवमिजल्या तृणांतून, वसंताच्या आम्रमोहरांतन भटकत राहतें. ग्रीष्मांत त्याला पुन्हां कसेंबसे पंजरीं आणावे आणावे तोंच ते पुन्हां हुंदडडत बाहेर पडते, कारण, वषोक्रतूच्या ग्रुद्गंवाच्या पद- न्यासाने सारीं इंद्रियेच त्याळा फितूर झाळेळीं असतात !

बोलायचे कुणाजीं

कुणाळा चहा आवडो किवा आवडो; परंतु चहापानाचा कार्यक्रम मात्र सगळ्यांनाच आवडतो. चहा घेणाऱ्यांनींहि चहापानाच्या कार्यक्रमाला अवश्य यावें, अशी निमंत्रकाचीहिे इच्छा असते. म्हणूनच तो कॉफी, कोका किंवा दूध अश्या चहाळा पयायी पेयांची तरतद॒ करून ठेवतो. कारण चहापानांत चहाला महत्त्व नसून त्या निमित्ताने घडणाऱ्या संभाषणाठा महत्त्व असते, असे मानळे जातें. चहापानाचें निमित्त करून हे ठोक चक्क इतर विषयांवर तोडसुख घेतात. कोणत्याहि चिलर-थिलुर वा सुतकी-गंभीर विषयावर बोलायचे झाल्यास चहा- पानाचा मंडप उभारला जातो. चहापानाचे हे लाघवी स्वरूप पाहून मीदेखील सुरवाती- सुरवातीस चहापानाच्या कार्यक्रमास जात असे; जेथे मनमोकळे बोलतां येईल, निभेरतेनें खळखळून हंसतां येईल, असें हें स्यळ असावें अशी माझी अपेक्षा होती. आणि दुसऱ्याशी तोंड भरून

*****९५१९१९११५९१९९१९२५-११५५-५५९१३-५१५-५-५-५-५९५१५५११५५५५१५५५०१५१५-५१५-५१५-००१-१५०-५-१-३२ शशाबदूत

बोलणे ह्यासारखा दुसरा आनंद नाहीं | संगीताच्या खाळोखाळ जर काहीं मळा मनायासून आवडत असेल तर ते म्हणजे दुसऱर्‍यांशीं संवाद करणें होय, मनाळा आवडळेळी गोष्ट दुसऱ्याला सांगितल्या- शिवाय माझ्या आनंदाला पूणेताच येत नाहीं.

यावरून मळा खूपच मित्र असावेत असा जर निष्कषे काढला तर तो फारसा बरोबर ठरणार नाहीं. जे आहेत त्यांच्या सहवासांत मी दिवसाचा बराचसा भाग घाळवीत असेन अहि म्हणतां येणार नाही. म्हणजे मी द्या मित्रांशी बोलत नाहीं असें नव्हे. तसें मी लहानग्या मंजूपासून आमच्या गळींतल्या रात्रींच्या पहारेकऱ्यापर्यंत सगळ्यांशींच * चार शाब्द बोलतो. परंतु त्या बोलण्याला नेहमींच माप असतें, मर्यादा असते. हे बोलणे केव्हां संपेल ह्याची काळजी असते.

परंतु दिवसांतून असेहि कांहीं क्षण येतात कीं, ल्या वेळीं कुणाशीं तरी खूप खूप बोलावेसे वाटते. एखादी लावण्यमयी कल्पना किंवा आते हुरहूर मनांत अंकुरते, उमलते आणि पाहतां पाहतां आकाशाएवढी मोठी होऊन मनांत मावत नाहीं. असे झालें म्हणजे मी माझ्या मित्रांकडे धांवत जातो. मनांत रसरसून उन्मेषणारा आशय राब्द-फुलांतून आविष्कृत होण्याकरितां अधरांबर येऊन उन्मत्त लाटांप्रमाणे वडका देतो. डोळ्यांत एक सखप्नाळू भाव तरळूं लागतो. आणि मी अति उत्सुकतेने मित्राच्या डोळ्यांकडे पाहतों.

आणि जें व्हायचे तेंच होते, माझी खप्नाळू नजर त्याच्या नजरेशीं भिडतांच पाण्याच्या शिडकावाने उत. चाळलेल्या दुभाने खालीं बसावें तद्दत्‌ मन हिरमुसते. कांठोकांठ भरळेळा माझा उत्साह

दे हाशवदृत

मित्रांच्या त्या संथ प्रतिसादानं ' वसुदेवाच्या पेल्या * प्रमाणें क्षणांत रिता होतो. हा सारा खेळ क्षणार्धात होतो. आणि मग माझ्यांत कांहीं तरी ढवळून निघाले होतं ह्याची , जाणीव मित्राळा होण्याच्या ऑआंतच मी खतःला सावरून घेतो. तरीदेखील मावळणाऱ्या संध्या- रागाचे कांहीं रंग इतस्ततः विखुरळेल्या ढगांवर राहून जावेत, तसे मधाच्या उत्कटतचे कांहीं संस्कार नंतरच्या माझ्या बोलण्यांत जाणवल्याने मित्र मळा खोदून खोदून विचारतो, परंतु नंतरच्या त्या उसन्या कुतहुलाने मळा कितीहि छेडळें तरी, मधाच्या गीताचे सूर पुन्हां जमत नाहींत; विरस पावळेली शाब्दसारजा फुलत नाहीं; डोळ्यांत ओहोटीस लागलेल्या भावनेला फिरून भरती येत नाहीं.

मी जखमी अन्त:करणाने परत फिरता. . ,. परंतु परत फिरलो तरी कुणाशीं तरी मन मोकळं करून बीलण्याची आंतली गरज माझ्या एकळेपणाचा फायदा घेऊन उसळून वर येते. आणि मग ' बोलायचे तरी कुणाशी 2! हा एक नवा यक्षप्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. ' दिठीच पाहतां निविजे ) कां तोड भरोनि बोलिजे ना तरी दाट्टनि खेव दीजे ऐसे कवण आहे ! असले शोधन सुरू होते.

मळा वाटते, अशी गरज ज्या क्षणीं निर्माण होते, त्या क्षणीं प्रत्येकाला अलोकिकाचा स्पशे होऊन त्याच्या जीवनांत एका : नव्या सख्याचे ! आगमन होते. तो सखा मग सासुरवाशिणीच्या बाबतींत नदीचा भंगळेळा घाट बनून येतो; आणि तिच्या मनांत दाटलेळीं सुखदुःखे अपार सहानुभूतीने ऐकून घेतो. कुणाच्या जीवनांत तो सागरकिनाऱ्याच्या स्वरूपांत अवतरतो आणि त्याच्या

|. “| ५४९९-४३-४४. ४५.५-१-५-९-.०५३.-५-०-२-१-९-४-१-१.९-५०--९-०-५-४-१-१-४-९२५-९२-०-५.*.

हृदयांतील ऊर्मीऊर्मींना फेनववळ लाटांचे हात उंचावून अलगद झेळन घेतो. कुणाच्या आयुष्यांत सकाळ-संध्याकाळचे क्षितिज बनून येतो आणि त्याच्या अंतरंगांतील सप्तरंगी आशायाचित्रांना समेची साथ देतो. तुकारामाच्या आयुष्यांत तर ' तो ! भंडारा डोंगर बनतो; आणि त्याच्या अंत;करणांतील तळमळीस प्रसादमय अभंगवाणीचें रूप देतो.

झांपड लावलेल्या रोजच्या घबडग्यांत मात्र कंठापासून बोलण्याची एकच भाऊगर्दी उडालेली असते. त्यामुळे ' कुणाशीं बोलायचे £ : हा प्रश्न निमाण होण्याइतकी उसतच नसते. आलेला दिवस जगून काढण्याची एकच घांदळ उडाळेळी असते. माणसें सारखीं एक- मेकांशीं बोळत असतात. परंतु त्याच वेळीं तीं एकमेकांपासून शत- योजने दूर असतात. आपलीं वरवरचीं सुखे घोळून दुसर्‍यांना सांगून आपल्या वेगळेपणाचा आभास निर्माण करतात; तर कधीं आपली व्यथा दुसर्‍्यापासून लपवून आपळे जीवन खाजगी असल्याचा अभिमान बाळगतात. त्यामुळें दोन्ही वेळां ' सुखे दुजाच्या हिरवळ चित्तीं दुःखे डोळां पाणी ॥? ह्या भूमिकेवर तीं कवी येतच नाहींत; एकमेकांना समजून घेत नाहींत. सदाफुळीसारखी वाणी सदा फुळळेली असूनाहे त्या राठ शाब्दांच्या चाहुलीने आंतळे कोमल उत्कट भाब लाजाळूच्या झाडासारखे अंग मिटून देशोबडीला लागतात,

परंतु ह्या धबडग्याचा उबग येऊन जेव्हां ' बोलायचे कुणाशीं £ ? ह्या सुगंधाचा वेव मळा लागतो, तेव्हां मी कस्तुरीमृगासारखा सेराविरा धांबत सुटतो. कीं चांदण्या रात्रीं माळावर बसून आकाशाकडे टक

११

शेशवदत

लावून पाहतो; त्या बेळीं माझ्या मनांतील आशय कारंजासारखा उत्स्फूततेने बाहेर पडतो आणि अमित चांदण्यांशीं हितगुज करीत बसता. कधीं मी माझ्या अभ्यासिकेत पुस्तक वाचत असतांनाच पश्चिम क्षितिजाच्या खिडकींतन तो ' खमसखा ! सुगंधी पावलांनी येतो आणि आपल्या प्रसादमय हातांनीं माझे चमेचक्षु मिटतो. तत्क्षणीं मी त्याला ओळखतो. त्याचे दोन्ही खांदे घुसळून त्याळा माझ्या शेजारीं बसवून घेतो. आणि वाचलेल्या भागांतील उपमासौंदर्य, नादमधुर शाब्द-योजना, तरल प्रतीके यांचे रसग्रहण करीत बसतो. त्या वेळीं त्याचा चेहरा ताज्या फुलाप्रमाणे फुढडून निघतो. आमच्या त्या गप्पा ऐकायळा काळहि ओठंगून उभा राहतो.

कधीं मानवी जीवनांतील नियतीच्या अबोध तांडवनृत्याने मी दिड्मूढ झालो म्हणजे तो * स्वप्नसखा * माझ्या खांद्यावर आश्चासनाचा हात ठेवून जीवनाचा अन्वयाथे समजावून देतो, कधीं कधीं तो दूरवरच्या गिरिदरींतीळ वृक्षवलुरांतत हिरवी साद घाठतो; आणि जावूने भारल्यागत मी त्याच्याकडे धांवून जातो. त्या वेळीं तो मला फळाफुलांतीळ, पणीपर्णांतीलळ कनेकविव रंग-आकाति-सोदर्यांचे विश्व- दर्शन घडवितो, ते सोद्येपान करतांना माझ्या मनांत बोळ उमटतात-- : माझें सुख मोठे, सुख मोठें, ठेबुं कळेना कोर्ठे | !

हा * खप्नसखा ? भेटला म्हणजे तिठ्यातिठ्यावरील ग्रामोफोनच्या तबकडीसारखं चाळणांरे बोलणे बंद होते. पण ' वृक्षवछी आम्हां सोयरी वनचरे ! झाल्यानें मन हजार मुखांनीं बोलके होते. एकी- कडे * दुसऱ्यामध्यें कोण मिळे छंद चाळे बहुमते ! असल्या शब्दांतून तुसडेपणाचा आभास होत असला तरी ' जेथे जेथे जासी

१२ शेहाबवूत

तेथे मजचि तं पाहसी ऐसा पसरीन भाव रिता नाहीं कोणी ठाव ! असा सवेस्पर्शी सुवास दरवळत असतो.

मळा तर वाटते, ' बोलायचे कुणाशी? ! असं वाटायळा लावणारा क्षणच माणसाच्या जीवनांतील ' पसायदान ! आहे. असल्या क्षणांच्या स्पशनेंच माणसांची मने विशाळ होतात, माणसामाणसांतील शारीरिक तट धडाधड कोसळून पडतात आणि मनें परस्परांत मिसळून जातात.

विकत घेतलेलीं माणसें

बोलण्याच्या गरजेमुळें माणसांचा मेळावा जमतो आणि वाचण्याच्या ओढीमुळे पुस्तकांचा गराडा पडतो, गप्पा जश्या बाजारी मोल देतां पद्रांत पाडतां येतात, तर्सेच वाचनहि फुकटांत साधतां येतं. वाचनाच्या बाबतींत अगदींच उपोषण घडू लागलें तर मासिक हप्त्याचा * आंवळां देऊन भाराभर पुस्तर्के वाचून काढण्याचा ' कोहळा? वाचनाल्यांतून मिळावितां येतो, आपली वाणी लाघवी असेळ तर दुसऱ्याची पुस्तके हातउसनीं आणून अलिप्त मनाने परत करतां येतात,

मात्र * पुर्ढ वाचीत जावें, मागच विसरावे! ही दुडकी चाल कधीं कधीं अडखळते, एखादे पुस्तक वाचून झाल्यावर देखील संपत नाहीं. परत केल्यावर देखील जात नाहीं. कामाच्या धबडग्यांतून थोडेसें मोकळें होतांच त॑ खायला उठते. खरें म्हणजे आपलाच दाम खोटा | माझें मनच मुळी फितुर होऊन त्या पुस्तकांशी संगन- मत करीत असतें, म्हणून मग मी तरातरा दुकानांत जातो. आणि

*-

21 4--१-५-५-५५१-१-२-१-२-२-१-१-१-९-९-९-५-१-९-१-१-१-१-१-१-९-१-९-१-१-१-१-१-१-१-१-१-१-१-१-६-१-९-९-१-९-९-९-१-९-१-९-९-१-१-९-९-१-१-१-२-९-२-२-२-७ रारवदूत

ते पुस्तक विकत घेतो. घरी आणता आणि लगेच हलक्या हातानें फडताळांत ठेवतो,

आतां यापुढची हकीगत खरी सांगायची म्हणजे मी ते पुस्तक पुन्हां करचितच उघडून बघतो. कामाच्या धबडग्यांत वेळ होत नाहीं. पण हें कारणाहि तितकेसे खरे नव्हे, वेळ होत नसता तर आणखी नवीं पुस्तके आलीं नसती. खरे म्हजजे वेळ असतो तेव्हांदेखील मी त्यांना हाताळत नाही. फार झाळें तर उडत-बागडत उलगडून बघता, लहानपणीं मावशीच्या पदराला तोंड पुसून मावशीकडून ओरडून घेतल्याशिवाय चैन पडत नसे. आतां मावशी घरांत आहे, या जाणिवेवरच भागते. तसेच ह्या फडताळांत अगत्याने आणून ठेवलेल्या पुस्तकांच्या बाबतींत होते, अगदीं सुरवातीस घेतळेळे * स्मृति-चित्रे हे पुस्तक पहिल्या वाचनानंतर फार तर दोन-तीन वेळां चाळले असेल. परंतु पुस्तक चाळळलें नसले तरी लक्ष्मीबाई टिळक रातराणीप्रमाणें आपल्या अस्तित्वाचा सुगंध दरवळत आहेत याचा प्रत्यय मला दरक्षणीं होत असतो. तीच गोष्ट ' स्माति-चित्रां !- जवळच असणाऱ्या * कांहीं म्हातारे आणि एक म्हातारी ची, धूळ खात पडलेल्या पानांतूनसुद्धां त्यांची चिरतरुण जीवनसन्मुखता बठटेल्या झाडावरील पालवीप्रमाणे तरतरून वर आलेली भासत असते, ह्या फडताळांत नंतर कितीतरी माणसें येऊन राह्यली. अमीलची ' चिंतनिका ' घेऊन साने गुरुजी आठे; ' अँटनी अँड्‌ हिओपात्रा ! बरोबर ' मेयर ऑफ्‌ कॅस्टराभेज ' उभा राहिला; विरही व्यथेचे काव्य दर्शविणाऱ्या 'मेघवूता! बरोबरच “तुकारामवचनामृतां!तून आत्मशोधन करणारा जीवनप्रवासी तुकाराम हृदयस्प्शे करूं लागल.

१५

वाचनवेगाच्या हिशेबाने तीं सर्वे पुस्तके एकाच वेळीं मीं वाचणे शक्‍य नाहीं, हा हुकमी एक्का हातांत घरून त्यांतल्या एखाद्या पुस्तकाची मागणी कोणीं केळी तर मी लगेच अस्वस्य होतो. मी एकेरीवर येऊन ' पुस्तक मुळींच मिळणार नाहीं ! म्हणून ओरडतो. माझ्या पुस्तकांच्या बाबतीत काळकाम वेगाच्या प्रांतांतील बथ्थड वृत्तीचा प्रश्न मी समज शकत नाहीं. आणि आमचे मित्र मीं पुस्तकासारख्या निर्जीव वस्तब्राबत इतके जीव लावून कां बोलावें हें समज शकत नाहींत, परतु तयांना ह्या वेळीं आणखी पुष्कळच गोष्टी समजणार नाहींत ह्याची मळा खात्री पटते, कारण अशा वेळीं ते आपलें लहानपण विसरठेळे असतात आणि माजघरांत आई आहे ह्या विश्वासावर अंगणांत एका अबोध निभरतेने बागडलेल्या प्रसंगांतील काव्याला ते पारखे झाळेळे असतात, आपले तारुण्याहे ते विसरठेळे असतात आणि घरांत पत्नीचं गानरम्य विह्रण चाळू असतांना दिवाणखान्यांत दरबळणाऱ्या प्रसन आणि तरल वातावरणाशी कृतध्न होतात, एकाच गांवांत राहून भटणारा मित्र परगावी जाऊं लागतांच अंत:करणांत निर्माण झालेल्या आणि उत्कटतेचं दर्शन घडविणाऱ्या हुरहुरीशीं प्रतारणा करतात.

खरे म्हणजे कासवी केवळ आपल्या दृष्टींन पिलांचे पोषण करते त्याप्रमाणे हीं पुस्तके नुसल्या त्यांच्या फडताळांतीलळ अस्तित्वाने माझें जीवन सांवरून धरतात; जीवनाचा अन्वय लावण्याची दृष्टि देऊन माझे भावजीवन समग्रुद्ध करतात आगे “ते जे लोचन आंत खोल दडळे ! त्यांना उघडून चराचरांताल सोंदर्यपुष्पांचे दर्शन घडवितात,

शैशवदूत

**-१११-१--०-५ शषाव द्त

माझ्या समजुतीप्रमाणे माझ्या फडताळांतीळ पुस्तकांची तार्किक मागणी करणाऱ्या लोकांना घराचा सम्यक्‌ अथेच अद्यापि समजला नसात्रा, त्यांच्या दृष्टीनें घर म्हणजे म्हणजे आहार-विहार, निद्रा, भय, इत्यादि गरजा निवारणारे॑ एक ठिकाण असते. वास्तविक : गरजा साधनस्वरूपाच्या असतात आणि घरामध्ये ह्यांपेक्षां अविक कांहींतरी असतें ! ह्या साक्षात्काराकडे ते पाठ फिरवूनच बसलेले असतात. आणि कोटुंबिक जीवनांतन लाभणार्‍्या एका पसायदानाळी ते आंचवतात, एखाद्या प्रसन क्षणीं ह्या पसायदानाचे अस्पष्ट दशन त्यांनाहि होते. आणि त्या दर्शन-काळांत हीं माणसेहि मग बाजारां- तून एखादें चित्र, एखादें शिल्प वा पुस्तक आणतात. खरें म्हणजे ते ह्या वस्तु आणीत नसुन त्या वस्तच्या माध्यमाने एक रासिक माणूसच आपल्या भावजीवनांत आणीत असतात, त्या रासक माणसाच्या आगमनाने त्यांच्या अंत;करणांतील पारिवारिक जीवनाची धारणा नब्या जोमाने पल्लवित होते. बाजारांतील 'चौकटींतून खते मूल्य सांगणांऱ्या वस्तु घरांत येतांच आत्मीयतेच्या स्प्षीनें अमूल्य होतात. एकळलेपणाची विकाति देशोधडीला लागून हृदयांत संवादाचा उदय होतो. ' कलंद्राःच्या किंवा ' राजाराणी'च्या जीवनाची कक्षा विस्तार पावते आणि घराला पारिवारिक जीवनाचा सुगंध लाभतो, आणि मग दिवसभर पोटासाठी दाही दिशा भटकणाऱ्या पायांना सायंकाळीं हीं विकत घेतळेलीं रसिक माणसें घराचा स्पर्श करतात. तेव्हां पायांवर सत्ता चालते हृदयाची ! म्हणून तर पांखरें ज्या ओढीने कोटरीं परततात, गुरें गोठ्याकडे धांव घेतात, त्याच ओढीनें मीहि माझ्या खोळीकडे धांव घेतो. अधीर होऊन कुळूप काढतो. आणि

क्षेशवदूत *२४९५१4५०4५-१-५-१-५१-५५-५११-५१-१५-१५-१५५५५५१-५१-५१५-५-१-५१५-१-५-५-१-५4-१५-१५१-१५-५११-१-१५-५१-५५१५१-१-११-११4१५१-१५१-१-५१.०4५-५१ |

डोळे भरून ह्या ' माणसां ! कडे पाहतो. त्या वेळीं ते॑ फडताळ म्हणजे ' आश्वासस्नेहभक्तीनां एकं आयतनं महत्‌! आहे, ह्याची तीव्रतेने जाणीव होते. दिवसभराच्या दिशाद्यून्य धडपडीवर अन्वया- थांचा प्रकाश पडतो. पोरकेपणाचें सांवट विरते. पारिवारिक जीवनाचे वासंतिक वारे वाहूं लागतात. सहन केलेल्या व्यथेला' बदामी डोळा फुटतो. पुस्तकांतील हीं अनेकविध माणसें उबगलेल्या माझ्या मनाला पुन्हा जीवनसन्मुख करतात, आजूबाजूच्या माणसां- कडे समजून घेण्याच्या * वृत्तीने पहावयास प्रवृत्त करतात, वनवासांतीळ पांडवांना कषीमुनींनी निरनिराळ्या राजांच्या खडतर जीवनकथा सांगून रिझवावें, त्याप्रमाणे हीं ' विकत घेतळेलीं ? अमूल्य माणसें आपळे जीवन अंतःकरण मोकळे करून सांगत सांगत मला प्रफालित करतात. त्यांच्या शीतळ आत्माविष्काराने जिकडे तिकडे मृदृगंधाची उधळण होते. प्रश्ांततेची वैजयंती माळ गळ्यांत पडते, अंधाऱ्या रात्रींच चांदणे फुलते आणि उद्यांच्या उष:कालाची प्रतीक्षा करीत शांत झोप लागते.

परंतु त्याकरितां माणसांचीच भूक पाहिजे, पण तेवढ्यावराहे भागत नाहीं. ' दुसर्‍या माणसाळा समजून घेण्याची इच्छा जागृत असणें ! हीच प्रकृति झाळी पाहिजे. म्हणजे मग हीं विकत घेतळेलीं माणसें ! जीवनांतील गैरसमज, क्रोध, हष, मत्सर आदि षड्रिपु हे कसे धुक्याप्रमाणें आहेत, ह्याचा प्रत्यय आणून देतात, हितगुजाचा कौमुदी प्रकाश पाडून तुमच्या - आमच्या विश्वांत सौंदर्य, सामथ्ये आणि सम्रृद्धि कशीं अणुरेणूंत भरलीं आहेत, याचें दर्शन

मोठ्या रसिकतेने घडवितात, मातीपासून वूर पळणाऱ्या पायांना डो.

बे 4 8 <३ ९१-६१ ९-$-३-६ ४१-३४ 0-$-6-३----७ $$ $७--१-३-५१ ४-४-६ -३-९-$--६-३-१-३-७-६-१-६-१-३-३-३- ७-३-३-३-७ ३-६-३-३-१-३-३-३ -1| शवढदूत

मातीच्या दुर्दम्य सृजनशीळते'ची प्रयोगशील दृष्टि देतात आणि ह्यासाठी £ परोपदेशा चे विफल माध्यम वापरतां खतः जीवन जगत दुसऱ्याला विश्वासांत घेतात, माझ्या टीचभर खोलींत म्हणूनच कधीं एकच प्याल्यां*तील सिंधु हसऱ्या वृत्तीने दळत बसळेली दिसते, उत्तररामचरितां तीळ राम देंडकारण्यांत सीतेच्या स्मृतीनें विव्हळ झाल्यानें आपल्या प्रजाजनांची मनोमन क्षमा मागतो आणि आपल्या अंतःकरणांतीळ दोन बाह्यतः विरोधी दिसणाऱ्या भावनांच्या संघर्षा- तील काव्य दर्शवितो, कधीं “* सतारीचे बोळ मधील केशवसुतांची विभूति विश्वामाजीं कशी पसरत जाते, ह्याचे तरळ दर्शन घडते.

म्हणूनच बाजारांत प्रीति मिळत नसली तरी आपल्या जीवनांतन : प्रोते ही तपस्या असते ! ह्याचा प्रत्यय देणारीं माणसे मिळतात, जीवनांतळा आनंद विकत घेतां येत नसळा तरी तो कोणत्या प्रकारें मिळतो ह्याचे विश्वदशीन घडविणारीं माणसे मिळतात. अशीं माणसे तुमच्या-आमच्यासाठीं कल्पवृक्षासारखीं नित्य मोहरून उभीं असतात. तुम्ही फक्त त्यांना आपल्या घरीं आणायला हवें आणि त्यासाठीं : घराचा ! अथे समजलेला हवा.

अडारीरिणी

ञ्या लेखकाने तिची आणि माझी भेट घडविली होती, त्याच्या दर्शनाकरितांच मी आज आसुसलों होतो, यांत तिच्या संमतीपेक्षां माझ्या हदट्राग्रहाचाचच भाग अविक होता. पण या हद्राग्रह्याचा उगमाहि तिच्या षरिचयांतच नव्हता काय १? असा खसमथेनात्मक प्रश्न विचारून मी माझ्या हट्राम्रह्माचे अपरिहायेत्व प्रतिपादत होतो. कारण ह्यापूर्वी मीं कर्धी पुस्तक वाचून झाल्यावर लेखकाची लौकिक चौकशी केली नव्हती, उलट, ह्या नव्या वेधानें तिने मलाच अखस्थचित्त केले होतें.... इतक्यांत ञ्याच्या दरीनाकारितां मी आलो होतों, तो लेखक समोर आला, त्याला पाहतांच मी गोवळलो. तिनें ल्याचे जं रूप उभें केलें होतें, त्याच्याशीं प्रत्यक्षांतील हे पंचमहाभूतात्मक रूप जुळत नव्हतें. अथातच हे मला पेलले नाहीं! मीं हिरमुसल्या मुद्रेने तिच्याकडे प्रतिसादाकरितां पाहिले, पण....पण ती तर केव्हांच माघारीं परतळी होती. झपाझप पावळें टाकीत खूप लांबवर गेली

क्क “३ / 4-१-५-२०-५-4-२५-११२१५-५१ *२* ९१.२५ १-५१-९-९-१-५१-२-९-१-१-१-९-१-०-१२-९-५ २-५-३-१-५-६-२-१-१-१-१-१-१-१-१-१-१-१-१-९-९ शरावबदूत

होती. मळा हें तिचें अवसानघातकी कृत्य मुळींच आवडले नाहीं. ठेखकाची भेट घेण्याचा हा अकाल हट्ट मीं धरूं नये, असे जरी तिचें मत ' होते तरी काय झाळे? ती अशी तडकाफडकीं निघून गेल्याने मी कसा उघडा पडलो, ह्याची तिळा जाणीव असायला नक) का? मग मी तरी काय करणार ? हिंओपात्रा निघून गेली असे कळतांच रणसागर सोडून जाणाऱ्या अँटनीप्रमाणें मी ठळेखकाशीं त्रोटक बोळून तिच्यामागून फरफटत गेलों.

तिच्याशी परिचय झाल्याचा हा पहिलावहिला प्रसाद मळा "फारच लागला ! त्या लेखकावर आपण अन्याय केला, असे सारखे वाटून चुकल्यासारखे होऊं लागळे, अपराधी मनाने घरी येऊन मी त्याचे पुस्तक धेऊन बसलो. हळुवार हातांनीं त्याला कुरवाळले, ,विमनस्कपणे त्याचीं पाने चाळठीं, मधूनच कुठें तरी वाचायला सुरुवात केटी. असे अस्थिर वाचन सुरू असतांनाच केव्हां कुणास ठाऊक ती हलक्या पावलांनी आंत आठी आणि माझ्ञे दोन्ही डोळे झांकून म्हणाली, रागावू नकोस. हा बघ तुझा आवडता ठेखक, “अक्षराअक्षरांतत आणि पानापानांतून त्याचें अव्याजमनोहर रूप रसरसून आलें आहे.”

पण तं. मघां अश्शी सोडून कां गेळीस १” मीं फुरगटून विःचारले,

£ ते तला इतक्यांत कळायचं नाहीं. £

“- मळा कळत नाहीं म्हणून तर तुला विचारतोय्‌ ना! 7

पण तं सांगून कधीं कळणार नाहीं.

म्हणजे मला बनवितेस होय £ /

34

£ होय ! तुळा घडवतेंय. पण माझ्या शाक्तीमं नव्हे, तुझ्या वेगानं,

£ हें कांही. मळा कळत नाहीं. पण तं. माझ्याबरोबर आलं पाहिजस. कबूल ?

बरं, कबूल !

ह्या समजावणीने मी खर्शींत येतो. आणि मग कितीतरी वेळ तें पुस्तक मी वाचीत राहतो. तीहि माझ्या शेजारीं बसून आहल्हादार्ची फुलें माळूं लागते. तिच्यामुळे तो ळेखकाहि मिटलेल्या पुस्तकांतून बाहेर डोकावतो आणि पुन्हा मनमोकळेपणाने हितगुज करूं लागतो. त्या गप्पा चाळूं असतांनाच आई येऊन मला गदागदा हलवीत म्हणते, अरे, केव्हांचं वाढून ठेवळे आहे. हांका तरी किती. मारायच्या |! /

मी भारावलेल्या पावलांनीं माजघराकडे चाळूं लागतो, माजघरांत शिरतां शिरतां मी मागे वळून पाहतो. ती चक्क तोंडावर हात ठेवून हंसत असते !

नंतर दिवसभरांत ती फारशी भटतच नाहीं. कामाच्या धबडग्यांत मलाहि तिची आठवण होत नाहीं; गरज भासत नाहीं; ठरलेले काम वेळेवर व्हावे म्हणून मी रस्त्याने टांग्याच्या घोड्याप्रमाणे सरळ जात असतो. पण मध्येंच एखाद दर्य आगंतुकपणे माझ्या दृष्टिपथांत येतें, आणि कुठेंतरी कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे सुरकुतळेळा चेहरा गुबगुबीत मुलाचा मुका घेतांना दिसतो, ते मूलहि बेटे खुशाल त्या थरथरणाऱ्या गळ्याठा मिठी मारते! माझ्या चेहऱ्यावर नापसंतीची मुद्रा आकारू लागणार इतक्यांत ती कोठून तरी अलगद येते आणि आपल्या

शैशवदूत *३-९-१-4-६-९--९-९-३-९-4-३-९-६--३-९-९-९-७-९-९३-७-३-$-$-३-३७३-

4&५९४ ४५-९१ & *९-५-५-५७-१-९२-५-५ १-*.२*-९-*-५-१-4-* ९-५-५-५-५-२-९-५-*-९ *-५-* ५-५ ५-१-4-१-१-२-५ शा शावदूत

२.३

कुस॒मकोमळ करांनी माझे डोळे झांकते. तेव्हां कांहीं तरी जावू होते ! दुपारच्या उन्हाचे श्रावणी सोनें होते आणि समोर दोन बिनवयाच्या भावना परस्परांशी हितगुज करतांना दिसतात, अंत:- करणांत सह-अनुभूतीच्या सोरभ-ऊर्मि उसळतात. माझ्या डोळ्यां- वरीळ तिचे हात सोडवून मी तिळा पाहूं लागतो. पण ती कुठेंतरी वूर गेळेली असते.... .... तिच्या अशा वागण्यानेच मळा तिचा राग येतो. पुन्हा तिळा कधीं भेटायचे नाहीं असे मी ठरवितो. ही अंतमेख करणारी हुरहुर नको म्हणून मी मद्रामच वद्चप्रावरणांच्या जगांत जातो. त्या अड- सराळा टेकून उगाच पाहत राहतो. परवांचीच गोष्ट, गायन- समाजाचा वाढदिवस होता. अर्थातच मीहि तेथे गेलो, चांगळा नटूनथट्टन गेळो, सगळे तसेच आळे होते. आपली देहळता तलम वसनांनीं खळवीत, खुणावीत सत्रेच एकभेकांकडे पाहिल्यासारखे करून पाहत होते. डोळ्यांच्या तराजूने परस्परांच्या सोदर्यभूषणांची किंमत अजमावीत होते. त्यांत खत:चे स्थान ठरवीत होते. तोडाळा ळावठेल्या पावडरच्या कारखान्याचे नांब शोवण्यांत गंतन पडत होते. तिकडे गाणे केव्हांच सुरू झाळे होते. खर लागला होता आणि तबळजीने सम साधून एकताळाला सुरुवात केळी होती. पण अजून मी सुताच्याच विश्वांत होतो. ते पाहून ती अपार करुणेने माझ्याकडे घांवत आली आणि आपल्या खरकोमल हातांनी तिने माझे नेत्र झांकले, तेव्हां माझें देहासक्त मन निमिषांत अनिकेत झाळे आणि खरांच्या अरूप लयींबरोबर विश्वसंचार करूं लागळें. तबळा सारंगी आणि

१-२--१-५-१-५१-५-५-१-५-२५-९२५५१-१५१-१-१-११-१५-१-१-१५-५-१-५-३ -“ई-!

दोदवदूत *“

गायक ह्यांच्या खरांबरोबर मी आणि ती फेर धरून नाचू लागलो. नादब्रह्माच्या त्या अनेकविध नृत्यविभ्रमांत आकाशाचा स्पर मला झाला, सम साधून गायकाने राग संपवितांच तिने मळा अहुद जागेवर आणून बसविळें. खरांच्या माहेरीं गेळेळे माझें मन त्या वेळीं विलग झालेल्या अधरांत उमढणाऱ्या फुलाचे स्मित होऊन झुळत राहिळे.... .... |

तिनें आतां मळा पुरतेंच झपाटळें होते. त्यामुळें माझ्या दृष्टीच्या विश्वांत एक नवाच प्रकाश पडला, त्या प्रकाशांत दिवाणखान्यां- तील वयोवृद्ध गांधीजी आणि वसंतवयी जवाहरलाल ह्यांचा फोटो पाहतांना वयाच्या अंतराचे धर्के पार विरते आणि तेथे उरते फक्त अतर उमलविणारे सकाळचे कोवळे ऊन ! माझीं मतेसुद्धां आतां पार बदळलेलीं आहेत. माझ्या त्या मिटठेल्या डोळ्यांनी सरळ सरळ मी म्हणतो की, इतिहास-संशोधकांच्या दृष्टीने जरी ज्ञानेश्वरांनी एकविसाव्या वर्षी आणि नामदेवांनी ऐंशीव्या वर्षी शरीर सोडलें असलें तरी माझ्या मतें त्यांनीं एकाच वयाचे असतांना शरीर सोडले ! पाहिजे तर तिळा विचारा. ती तर चक्कच म्हणते कीं, ज्या भावनेच्या आधारावर माणूस साहित्यिक होतो, त्या भावनेळा वयच नसते. असलें तर तें समान असते.

भावनेला शरीरगत वय नसतें, तसेच ज्ञानालाहि नसते. म्हणूनच शिष्याकडून पराजयाचें पुष्प खीकारतांना गुरूळा खरोखरच हषे होतो.

तिचा हा अंधपणाचा प्रसादस्पशे झाळा म्हणजे एक नवीच अशरीरिणी दृष्टि मिळते. त्या दृष्टीच्या समेवरच भिन्न वयाच्या

शेशवदूत रासेकांची भेट होते आणि मग आनंदाचा सोहळा दशदिशांत उफाळतो. त्या दृष्टीच्या प्रकाशांतच एकनाथ आणि वाळबंटांतील पोर ह्यांच्यांतील सोवळ्याओवळ्याचा पट फिटतो. फुलांच्या सौदर्यानें लुब्ध झालेलें मन त्याला खुडणाऱ्या हाताला मागे खेचते आणि त्या पाकळ्यांच्या क्षितिजापलिकडून डोकावणाऱ्या सोदर्य-उषेचे रसपान कर्रीत बसते; कृतककोपामागीळ अकृत्रिम अनुसग पाहते; सायंकाळी आईनें मारल्यावरहि रात्रीं तिच्या कुक्टींत घुसणार्‍्या बालकाचा -मनोधमे समज शाकतें....

तिच्या ह्या प्रीतीनें मी पुरता आंधळा झालो आहे, अशी खात्री वाटल्यानेच ती आतां मला कुठोहि मुक्तपणे हिंडूफिरूं देते. त्या माझ्या पहिल्या आवडत्या ठळेखकाकडेसुद्धां ती यायळा तयार होते आणि पूर्वीसारखा मी आतां बिचकत नाहींसे पाहून ती खुदकन गालांत हंसते....

२४

जवळ जवळ वर्षभराने मी घरीं आलों होतो, येतांना शहरांतून बराच खाऊ आणला होता, ज्याचा त्याचा हविभोग देऊन झाल्यावर शोवटीं पिवळींधमक वब शिट्याशिट्यांचीं केळीं आईपुढें ठेवढीं. परंतु तिने अगदीं ' लाभालाभौ समे कृत्वा? च्या निर्विकार दृष्टीने त्याच्याकडे पाहिलेळें बघून मळा जरा आश्चयेच वाटले, आणि मीं म्हटले ; आईई, तुझीं आवडती केळीं आणली आहेत. £ अरे हो | परंतु मीं केळीं खाण्याच सोडलं आहे. / £ म्हणजे ? कसले पथ्य वगैरे £-” £ नाहीं, तशी माझी प्रकृति ठीक आहे. दुसरंच कारण आहे. परवां मी काशीला गेलें होतें ना, तेथे एखादी आवडती वस्तु सोडायची असते. मळा केळीं फार आवडतात म्हणून केळीं'च सोडलींत झालं. काशीचे नांव काढतांच उलटतपासणीच खुंटळी, कारण : काशीस जावे * असे जरी मी नित्य वदत नसलों तरी कधीं काळीं

के “ब - -*३९४४३१$४९-३-३७३५-३-३-६-१-४-९-३१-६-९-३-३-३-६-३-३-१-१-६-१-६-१-३ ३९ १-६ ३-४-१-१-१ ४-१ १-६-१-९-३--$-९-९-$-१-३-३-१ १-$-७-$-३-७ शशवदत

काशीला जायची इच्छा माझ्या भावाद्रे मनांत इंद्रधनुष्यासारखी प्रकट होते. परंतु आज आईने सांगितलेल्या-ह्या खास माहितीवरून एक नवीनच अडथळा निमोण झाला म्हणायचा ! म्हणजे मळा जर काशीला जायचे असेळ तर माझी आवडती वस्तु सोडाबी लागणार कीं काय ? परंतु माझी आवडती वस्तु तरी कोणती £

आईला केळी आवडतात तशीं मलाहि केळीं आवडतात, पिंवळ्या शेवंतीच्या कांतीचीं केळीं सोलतांना त्यांचा उमलत्या सोनचांफ्याप्रमाणे होणारा आकार तर स्वतःच्या अंगीं सूर्यकिरणां- प्रमाणे फुलांना उमलविण्याचे ' नाजुक सामध्ये? असल्याचा आल्हाद- दायक प्रत्यय आणून देतो. आपली ' मेणाहुनी मऊ ! असलेली वृत्ति पाळण्याकरितां तीं केळी बीच्या रूपानेदेखीळ कठीणतेचा किंतु ठेवीत नाहीत. केळींवरच काय, परंतु एकंदर खाण्यावरच माझें मनापासून प्रेम आहे. ( अज्ञ ठोक यालाच खादाडपणा असं म्हणतात | ) शूर योद्धा जसा शात्रूळा पाठ दाखवीत नाहीं, तसा मी अन्नाचा आग्रह करणाराळा पाठ दाखवीत नाहीं; किंवा दानशूर राजा ज्याप्रमाणे याचकाला स्वप्नातदेखीळ नकार देत नाहीं, तद्वत्‌ मी स्वप्नांतदेखीळ खाद्य पदार्थांना ' नाहीं ! म्हणत नाहीं.

एवढ्यावरून माझें * प्रेयस ! मुदपाकखान्यांतीळ निर्गितीवर उभारले आहे, असे मात्र नाहीं. कारण खाण्यापेक्षांहि मळा बांसरी वाजवावयाळा फार आक्डते. ' वाजवायळा आवडते! याचा अथे ( वाजवितां येते, असा नसून ) बांसरी वाजवितां यावी म्हणून तीव्र इच्छा आहे. परंतु इच्छाप्रूर्ति तर बूरच राहो, साधा सुरेळ खरदेखील मला अजून काढतां येत नाहीं. कुणी बांसरी वाजवायला लागला

कळे -] शवदूत 4३५११ **४५-१-१०५१-११२१२२१२११-५-१०९-4-१०44५4५१-१-५-५-१०१-०१-११५-१-९५-१-१-१५५-०२९-५.३-९२-२५१-०-१-२१4२१११२-१ १५9

४२ (::

म्हणजे मळा मोठा विस्मय वाटतो की, मीहि याच्यासारखीच कार्बनडायऑक्साईड हवा फुंकतो आणि बोटे वरखाठीं करतों; परंतु आमची हवा ' इकडून तिकडे गेळे वारे ! या वाटेने काबनडाय- ऑक्साईड राहूनच पसार होते आणि त्याची हवा मात्र नादब्रह्माचे लेणे ठेवून बाहेर पडते ! मात्र हा विषाद - विचार प्राथमिक स्वर ऐकू येईपर्यंतच ! बांसरीच्या त्या आते स्वरविस्तारांत आणि अनेकविध आलापांत माझे देहमान हळूहळू हरपते आणि माज्ञे पाय जरी जमिनीवर असले तरी “मी ? कुठल्या तरी अनामिक आनंदवनभुवनांत ! ठहरत असतो. त्या स्वरसमाधींतन जडसृष्टींत परतायला फारच जड जाते.

परंतु बांसरीपेक्षांहि मळा जर कोणती गोष्ट आवडत असेल तर ती ही कीं........ छे! छे! चित्रठेखने एकेक चित्र रेखाटळे 'आणि उपेनें प्रियकराची छबी दिसपर्यत ' नाही नाही म्हणावें तसे माझे होऊं लागळे आहे, म्हटळे, आपल्याला कांहीं आतांच काशीला जायचें नाहीं, तेव्हां निणेयाची निकड ठावा तरी कशाला ह्या सर्वे आवडणाऱ्या वस्तंतीळ नेमक्या कोणत्या गोष्टीहा आवडती ? म्हणून निर्देशावे हे काम, आईला ' तुळा कोणता मुळगा आवडतो ह्या प्रश्नाईतकेच, मळा अवघड वाटं लागते. कारण ह्या आवड- णाऱ्या वर्स्ठतील वस्तु सोडली म्हणजे मग जगण्यांत काय मौज आहे £? माझे आत्यंतिक प्रेम जर कशावर असेल, तर तें जगण्यावरच होय !- हया विचाराबरोबर मी एकदम दचकलो. म्हणजे जगण्याची आवड हीच माझी प्रिय वस्तु कीं काय ? आणि काशीला गेल्यावर जर जगण्याची आवड सोडायची असेळ तर मग

खे .“* रट २९४4-२५ २-९-१-५-५-१-११-२-५-१-१-५-१५-२ २५-१९ ४-१-९-५-२-१-९-९५-१-१-९-१-५-१-१-९-१-१-५-५-१-२-५-५.९-९-१-१-१-१-५-१-१ *१-१-२-३ शशवदूत

मरणावर प्रेम करायठा हवे ! म्हणजे घरबसल्या मरणाळा आमंत्रण द्याय'चें कीं काय

ह्या कल्पनेने मी अतिशय अखस्थ झालो, म्हटले, या अडचणींवन एखादा मधळा मार्गे नाहीं का सांपडणार ज्यांत जगण्याची आसक्ति उरली नाहीं आणि मरणाचा मुक्त मनाने खीकार करण्याची जाणीव उदित झाली आहे, अशी एखादी स्थिति नाहीं काय

मी खोलींतीळ येरझारा थांबवून मांडणींतील पुस्तकांकडे सहाय्याथे पाहूं लागलो, नेहमीं मनाशीं नेत्रपधुवी करणारीं पुस्तके माझ्या अडचणी निवारणारा मार्गे सांगतील म्हणून मी तीं पुस्तके चाळू ळागळो, त्यांत विविध विषयांच्या पुस्तकांचा काफिळा असला तरी विशेषतः टॅजेडींचा भरणा अधिक होता. ' हॅम्लेट ! जवळ ' एकच प्याला! होता, ' मेयर ऑफ कॅस्टराब्रिज !शीं ' अँटनी अँड क्लिओपात्रा ! बोलत होते, तर * डॉल्स हाउस 'जवळच ' सेट जोन ! उभी होती. हीं आणिक त्यांच्यासारखीं इतर माणसे माझी टॅजेडीची आवड पुरवायला कल्पवृध्षासारखीं मोहरून उभीं होतीं, हीं पुस्तके चाळत असतांनाच मघाचा ' काशीला गेल्यावर कोणती आवडती वस्तु सोडायची ? हा यक्षप्रश्न मधूनच माझ्या ढगाळलेल्या मनांत विद्य- लुतेसारखा चमकून जात होता. म्हटळे, या एकच प्याल्यां '१तील सिंधूला विचारावे की, ' तूं काशीला गेल्यावर दारू पिणाऱ्या सुधाकराचा त्याग करशील काय £? या हॅस्लेटला विचारावे कीं, : तू आपला ' गृ ७८ 07 ॥0६ (०७० हा प्रश्न टाकशील का? ? त्या कुरूप ओथेलोला विचारावे कीं, ' तं, आपली आत्यंतिक प्रेमवात्ति सोडशीळ काय १! किंबहुना या सरवेच नायकांना

शशवदूत *$७-$-९३-१-$-१-$-७ ३३-३३ $-$-३-१-$-७-१-९-$७ ३-$७-९-$-७-६-$--६-$-$-७--३--९-७-क-$-७--$-१-६-९-९-७-७-३-४-६-$-$-३-१-$-७-९-३-९-७-& “4 श्‌

जर विचारलें कीं, ' तुम्ही आपण होऊन स्वीकारलेल्या ह्या दुःखयातना सोडून चाकोरींतीळ आणि चौकटींतील सुखांशीं-ज्या सुखामुळें जगण्याचा मोह सुटत नाही-तडजोड कराल काय ' छे | छे! या लौकिक प्रश्नाला ' नाही, नाहीं! असे अलौकिक उत्तरच ते देतील | कारण त्यांनीं त्या दु:खदयातना उगाच का स्वीकारल्या होत्या ? दुःखयातना त्यांनीं जीवनाची किंमत देऊन पत्करल्या होत्या, त्याचें कारण त्या दुःखयातना त्यांना स्वत:च्या आत्मिक शुद्धीकरणाकडे नेणाऱ्या वाटत होत्या, त्या तशा होत्या म्हणूनच तर ' मेयर ऑफ कॅस्टरब्रिज !'मधीळ हेचाडे शेवटीं अनिकेत अवस्थेत मृत्यूचचा मुक्त मनाने स्वीकार करतो. ह्विओपात्रा सपाच्या प्राणघातक दंशाळा मृत्यूचे चुंबन म्हणून संबोवते, आत्मस्तुतीने हुरळून जाणारा पहिल्या अंकांतीळ पोरकट म्हातारा लिअर अनंत मनस्तापांतून विकासेत होत होत, नाटकाच्या अखेरीस तडफड कर्रांत नव्हे तर शांतपणे मृत्यूचा स्वीकार करतो,

तेव्हां अ्या परिस्थितींत ते खतःच्या दुःखयातना सोडतील ही धोपटमार्गी कल्पना व्यथे आहे, नव्हे, ह्या दुःखयातना सोडल्यावर मुळीं त्यांना जगणेच असह्य होईल. उलट ह्या दुःखयातनाच्या मोबद्ल्यांत ते सवे सुखांच्या राशीकडे पाठ फिरवितील, कारण टॅजेडीमुळें त्यांची चौकटींतीळ आणि चाकोरींतीळ जीवन जगण्याची आसक्ति नष्ट होऊन मृत्यूचा मुक्त मनानें खीकार करण्याची जाणीव उदित होत होती आणि म्हणूनच तर मला टॅजेडी आवडत होती, निदान भारतीय अध्यात्मशास्राच्या मातींत जन्माला आलेल्या माझ्यासारख्या रोपाळा तर ह्या दॅजेडीचें ' जीवन ! पोषकच वाटतें. कारण माझ्या

बत -] 8 ***१*****११११९१*१*१११९४१**** १११११४४४११ ४४९११११९१४ ४११४४११९१९ ९१ शरशवदूत

समजुतीप्रमाणे टॅजेडी ही एक प्रकारे अध्यात्मशासत्राचे, तत्त्वज्ञानाचे प्रात्यक्षिकच आहे.

अध्यात्मशास्राचे जे उदिष्ट की, जीव, जगत्‌ आणि नियती यांच्या परस्परसंबंधांचा सुसगत विचार करणे, तेच उद्दिष्ट टॅंजेडीमुळे साधळें जात नाहीं काय * टॅजेडी बघितल्यावर आपळेहि मन विचार करतें कीं, खरेच, काय अथे आहे या जीवनाचा ? कीं सवे टॅजेडींचा सखाळ अभ्यास करून शोपेनहोअर म्हणतो त्याप्रमाणे हे जीवन म्हणजे माया आहे * सत्त्व सत्त्व * म्हणून म्हणतात ते बाहेर आहे, कीं हॅम्लेट आदींना सापडळे तसे ते आपल्यांतच आहे * आत्म्याचा संपरण विकास आलेल्या प्रसंगाशी तडजोड करीत सुखमय परंतु मानहीन जीवन जगण्यांत आहे, कीं हाळअपेप्टांतीलह जीवन हंसत स्वीकारून सुवाकरावरील गाढ प्रीतीच्या कसोटीला उतरणाऱ्या सिंधूच्या प्रयत्नांत आहे ? या प्रश्नांची उत्तरे जर टॅजेडीच्या बाजूने असतीठल-नव्हे, तीं तशीं आहेतच-तर मग मी काशीला जाऊन टॅजेडीचा हा ' दिव्य अश्र ! मिळविण्यासाठी सारे ' ऐहिक हास्य ! सोडायला तयार आहे.

ह्या असल्या ' दिव्य अश्र देणाऱ्या टॅजेडीचा स्वीकार करण्यांत मी कांहीं अपरवे करीत आहे, असे मात्र नाही. कारण जीवनांतील ह्या ' श्रेयसा *ची जाणीव महाभारतांतील कुंतीलाहि होती. आणि म्हणूनच तर तिने, कृष्णाने ' वर माग ? म्हटल्यावर ' दुःख * मागून घेतले, कृष्णाने जेव्हां असळे अलौकिक मागणे कां मागितले, असें विचारले, तेव्हां तिनें दिठेळें उत्त आधुनेक टॅंजेर्डीच्या रचनेत असलेल्या आन्तरप्रवाहाशीं सुसंगतच होते. कुंती म्हणाली होती

******२4-4-44-4-4.:444२-५५५१५.५५-५.-२.4-२.१२-१३२५4.५4-५-०-५-.३ -.

होशवदूत कक के कीक कक केकी कती

£ तुझी आठवण नेहमीं राहावी ह्यापेक्षां मळा कांहीहि नको, आणि तुझी आठवण राहायला दुःखाइतका दुसरा उत्तम उपाय ताहीं.

ह्या उत्तरांत अभिप्रेत असळेळा परमेश्वर म्हणजे आत्म्याचे सत्त्वच नव्हे काय ? आणि ते सत्त्व जर आत्मविकासाची संधि देणाऱ्या, मुक्तीच्या धडपडीकडे नेणाऱ्या टॅजेडीने मिळत असेळ, तर कुन्तीने आजच्या युगांत टॅजेडीच मागितली असती.

आणि म्हणूनच काशीला गेल्यावर जर ह्या टॅजेडीचा-ज्यामुळें जगण्याची आसाक्त उरत नाहीं, परतु मरणाचा मुक्त मनाने स्वीकार करण्याची जाणीव उादत होते-ळाभ होणार असेळ, तर जीवनांतील सारीं चौकटींतीळ चाकोरींतील सुखे मी तेथें सोडायळा आहे.

ह्याचा अथे असा मात्र नव्हे कीं, मी जीवनाकडे पाठ फिरविणार. माझ्या मतें तर उळट मी अधिक जीवनोन्मुख होणार, कुणी तरी म्हटले आहे कीं, तुळा ' जगायचे कसे?! ह्या प्रश्नाचे उत्तर हवें असेल तर आधीं ' मरायचे कसें ! ह्याचे उत्तर शोध |! 7

दूर

गोष्टींतल्या नायकाळा गुळबकावळीचे फूल

परसांतीळ फूलझाडांतच मिळाल्याने जितका

हषे होईल तितका मोठा हषे मला त्या दिवशीं व्हायळा हवा होता. कारण बेकारीच्या वाळवेटांतीळ मृुगजळापाठीमागे हिंडून माझी उमेद दमली होती. तोच अचानक काळच गांबांतल्या गांवांत नोकरी मिळाली. परंतु नोकरी मिळाल्याने जरी ' गड आला....! होता तरी ती नोकरी गांवांतच मिळाल्याने ' सिंह गेल्यासारखेंच वाटत होतें. वाटत होते कीं, कुठें तरी दूरच्या गांवीं नोकरी मिळायला हवी होती. असं कां वाटत होतें त्याचा नीटसा खुळासा मला त्या क्षणीं करतां आला नसता. घरांतील माणसांचा सहवास मला नको होता असाहि त्याचा अथे नव्हता; उलट गांवांतच नोकरी मिळाल्याने तो सहवास आतां अखंडित मिळणार म्हणून मळा थोडं समाधान वाटत होते; परंतु तरीहि वाटत होते कीं, गांवांतच नोकरी मिळवली हे कांहीं तितकेंसें बरें झालें नाहीं. मात्र, घरांतील सवे

शेशवदू किवी अआआन्राव्र अअअअ.ि

माणसे आनंदलीं होती. गांबांतीळ मित्रांनी अभिनंदन केळे, कृत्रिम हेवा वाटल्यासारखे दाखवून मळा फुलविण्याचें नक्षीकामहि केलें मात्र तो आनंदवषाव माझ्या मनाच्या कमलपत्रावर दंवबिंदूंप्रमाणें शोभत असला तरी तितकाच तो अलिप्त राहूं पाहत होता. जणू कांही माझ्या जीवनांतन एक मोठा अमोळ ठेवा पुरुरव्याच्या उवेशीप्रमाणे येण्याकरिता निवून जात होता; आणि याची नुसती जाणीव मला होत होती. त्याळा मी थांबवू हाकत नव्हतो. सुख आपल्या लौकिक पायांनी चाळून येत होते अन्‌ मी कांहींतरी हरवल्याच्या अळौकिक हुरहुरींतच रेगाळत होतो.

अशा वेळी मग मी कधीं कधीं पुस्तक वाचीत बसता. बहुधा तें पुस्तक कवितेचं असतें. मीं पुस्तक उळगडळे आणि सुरवातीलाच : घाळ घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसांत ? ही निकुंबांची कविता दृष्टोत्पत्तीस पडली, पहांटेच्या आगमनाने रेगाळणारा अंधार नाहींसा व्हावा, तसें त्या कवितेने माझ्या मनांतीळ हुरहुरणारे औदासीन्य मावळले. मळा आवडणाऱ्या कांहीं कवितांपैकीं ही एक कविता होती. आणखी एका वेगळ्या अर्थाने ही कविता माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती. कवीं कधीं आपण निर्ळेप मनाने कविता वाचतो; तर कधीं योगायोगाने कवितेत जो भाव चित्रांकित केळेठा असतो तो भाव कविता-वाचनाच्या अगोदर आपल्या मनांत तरळत असतो. या दुसऱ्या अवस्थेंत असतांनाच ह्या कवितेने माझ्या जीवनांत प्रवेश केळा होता. शिक्षणाकरिता मी नाशिकला आलों होतो. आई-बडीळ पाऊणशे मेळ अंतराच्या एका खेड्यांत होते. १) सागरांतील जळ कितीहि दूर आणून ठेवलें तरी ते जसें

टे

- रु --*-५--५-१५-१-५-१-५५-१-१-१-१-५-११-१-१५-१-५-५-९१-९५१-९-९-१-९-२-१५-१-१-५-९५-१--१-९५-५११-९१-९१-१-२५१-१-१-५१-५५ २१-१-३-९-३ शशावदूत

नदीनाल्यांतन सागराकडे ओढ घेत असते, तसे माझे मन त्या वेळीं सारखे आईवडिलांकडे धांव घेत असे. असाच एकदां सायंकाळी घरच्या आठवणीने हुरहुरत बसळो असतांना शेजारच्या बगल्यांतीळ झोपाळ्यावर झोके घेतांना मुठींनीं म्ह॒टळेळीं : घाळ घाळ पिंगा वाऱ्या.... .... ' ही कविता ऐकली. त्या कवितेतील आतंता अतः:- करणाला किती अलगद रीतीने भिडली म्हणून सांगूं £ ' चंद्रकळेचा होव ओला चिंब होतो! या ओळींतील होव ओलाचिंब कां होतो ते कांहीं मळा तेव्हां नीट समजळे नाहीं. मात्र घरच्या आठवणींनी मी इतका व्याकूळ झालो की, डोळ्यांतून कढत अश्र केव्हां स्रवले आणि त्यामुळे शेटे ओलसर झाला ते कळलेदेखीळ नाहीं. सर्वे- प्रकारच्या सुखसोयींत देखीळ सासुरवाशिणीळा माहेरची आठवण येते. हा प्रसंग किती हृद्य आणि आते ! माहेरच्या आठवणींनी मनांत आलेल्या आतंतेत आणि हुरहुरींतदेखीळ एक प्रकारचे नाजुक सुख आहे, एक प्रकारची शीतलता आहे ! हें सुख आणि ही भावना हे ख्रीचे-सासुरवाशीण ख्रीचे-अमोल वैभव आहे. ल्या वैभवाची नुसती कल्पना यायची असेळ, तर ती फक्त आपल्या- जवळच्या माणसापासून कांहीं काळ वूर राहिल्यानेच ! शिक्षणा- साठीं वा अन्य ध्येयसिद्धीसाठीं घरापासून दूर राहावे लागलेल्या व्यक्तींनाच त्या वैभवाचे [किंचित्‌ दर्शोन होऊ शकेल !

नकळत मला माझ्या पहिल्या पाठवणीचा प्रसंग आठवला. त्या वेळीं मी अकरा-बारा वर्षांचा असेन. माझ्या गांवापेक्षां एक-दोन गांवे फक्त मीं त्या वेळीं पाहिलेलीं होतीं, पैकीं एक गांव तर आठवडी बाजाराचे होते, बाजारासाठी एक कोसावरीळ गांवाला

कजे शशवदूत $-$-७-$-%-३-९-३-६-७- कक ९९७७-३७-३९ २३६६-६-९-३-९-३७-३-३३-९-$-३९ ७-३ ३३-१-३-६-३-९-९७-९--३ १-३-३-६-$-३-३-३-३%-३ ३१५.

जाणें हे माझे तेव्हांचें दूर जाणे. मोठ्या खुषींत मी गाडीत जाऊन बसे. स्वतः बेळगाडी हांकावी, अशी माझी त्या वेळीं इच्छा असे. अनेक कारणांनीं मला ते सुख त्या वेळीं मिळाळे नाहीं. परंतु बाजारांत जाऊन खूप खूप वस्तु खरेदी करावयाच्या मनोरथांत ते दु:ख जाणवत नसे. बाजारांत गेल्यावर मी सवे कांहीं विसरून जाई. घर म्हणून कांहीं असतें, याची तर मुळीच आठवण राहात नसे. दिसे फक्त बाजार आणि त्यांतील मिठाईचीं खेळण्यांची दुकाने. हळहळ सायंकाळ होई. बाजाराळा आलेल्या गाड्या हळू हळू खेडेगांवाकडे परतू, लागत आणि मठाहि घरची ओढ ठागे. आपली गाडी केव्हा जोडणार म्हणून मी गाडीवानाठा वारंवार विचारीं; परंतु वडिलांच्या परवानगी शिवाय गाडीवानास कांहीच करतां येत नसे, आणि बाजार सरू लागला म्हणजे वडिलांचे बाजारांतीलळ काम वाढत असे. मला आईची सारखी आठवण होऊन मी व्याकुळ होई. बाजारांतीळ पालांच्या दुकानांतून दिवे लुकलुकू लागत, परंतु अजून वडिलांचे काम संपळेळे नसे. गाडीवान माझ्या प्रश्नांनी हैराण होत असावा. आणि मग किती वेळाने तरी गाडी जुंपठी जायची ! आतां घरीं. जायचे, या कल्पूनेने मी किती आनंदून जायचो ! वडील मात्र माझ्या घाईला उद्देशून म्हणायचे, ' पुढच्या बाजाराला तुला आणणार नाहीं! आजहि तो प्रसंग मळा सुखकारक वाटतो. दोन मेल, अर्धा दिवस घरापासून दूर राहणे ज्याला असह्य वाटते तो मलगा पाऊणशे. मेलठांबर सहा-सहा माहेने दूर कसा राहणार, हे त्रेराशिक आमच्या, घरांत चर्चेळा निघाले तेव्हां मळा मात्र फार आनद झाला, वगातील; सवे मुलांत माझा भाव एकदम वाढला,

२४-९-९५-३-१-३-३-१-३३-३-३-९-३-३-३३ शेदावदूत

३६ 4-२-*-4-२-९-१--५-९.१-९-१-१-१-९-९-५-९.-५-१-९-*

जिल्ह्याच्या गांबी वडील भाऊ रहात होता तिथे मी आतां शिक्षणासाठीं जाणार होतो. तिथे काय काय गमती होत्या कुणास डाऊक ! परत त्या वयांतीळ कल्पनेला ज्या ज्या गमती सुचतील त्या सवे कल्पून मी वर्गात फशारकी मारू लागलो. मास्तरांनी देखीळ माझे कोतुक कळे, घरांत मळा इतक्या वूर पाठवावे किंवा नाही, याचा अजून निकाळ लागला नव्हता. शेबटीं वडिलांनीं जरी साठवायचे निश्चित केळे, तरी आई मात्र तितकीशी अनुकूल नव्हती. सला वडिलांचा अभिमान वाटला अन्‌ आईचा थोडा रागच आला, राहवून मी आईला म्हटळे देखील---' तं कांहीं वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुझी मुळींच खंत करणार नाहीं. !

आणि अखेर निघायचा दिवस उजाडला, सगळ्यांनीं माझी नाना ग्रकारे काळजी घेतळी. माझी तयारी जगप्रवासाळा निघालेल्या साणसासारखी जय्यत वाटळी मळा ! पण एकच आवडले नाहीं. चंहिनींनीं मळा ' अभ्यासाकडे लक्ष असूं द्या बरं का भावोजी ? असं कशाला सुचवायठा हवें होते : जसा कांहीं गंमत म्हणूनच मी तेथें चाललो होतो ! परंतु हा सारा रुसवा अन्‌ बाहेरगांबी जायची ऐट आईला शेवटचा नमस्कार करतांना क्षणांत विरघळली; आणि मी समुसमुसून रडूं ठागळो, किती किती समजावळें तरी आईला सोडून जायची मठा पुन्हा इच्छा होईना. हुंदके देत देत आणि डबडबलेल्या नेत्रांनी मी माझेंपण विसरून गेळो; आणि सारें अंतःकरण घरच्या माणसांच्या प्रेमळ आठवणींनी भरून गेले, अशा अवस्थेंत मी गाडींत कसा बसलो त्याची आठवण मळा आज नाहीं. परंतु तो दूर दूर घेऊन जाणारा क्षण मला नंतर सुखद स्मृतीचा ठेवा होऊन बसला हे मात्र खर.

शेशवदूत ११*५९५५९५५-५५५५१५५५५ **११११५१५-५६५-५५५१-५५१-५५५५५-.९५१५-१५५५२५५-२१५५९५-५१५--५११-५१५१ - 1८)

आणि सहा महिन्यांनंतर जेव्हां दिवाळीच्या सुट्रींत घरीं जाण्याचा पहिला प्रसंग आला तेव्हां तर मनांतळा कोपरान्‌ कोपरा घरच्या ओढीने भरून राहिला होता. आमच्या गांवापर्यंत सव्हिस मोटार जात नव्हती. जेथे मोटार थांबायची तेथून माझा गांव सात कोस दूर होता. म्हणून माझे वडीळ मला घेण्याकरितां बैलगाडी घेऊन आले होते. त्या दिवशीं तिसरा प्रहर झाला होता; आणे सात कोस मजल मारायची होती. हें बहुधा बेलांनींदेखीलळ जाणल्यामुळें कीं काय, ते भरघांव निघाळे, वडील मला म्हणाळे कीं, घरीं माझी सर्वजण आतुरतेने वाट पहात आहेत. आपली कुणीतरी वाट पाहत आहे या जाणिवेनें तेव्हां मळा फारच सुख वाटळें. खरोखर घरच्या माणसां- पासून कांहीं दिवस दूर राहून नंतर भेटायला येण्यांत अपूर्व गोडी आहे. घर जसजसे जवळ येऊं लागले, तसतशी वाटेवरची प्रत्येक ओळखीची खूण बोलकी झाली. त्या सवे खुणांविषयीं एक नवीनच जिव्हाळा निमोण झाला. त्या गुंगींत असतांना घर केव्हां आले ते कळलें देखील नाहीं. दारांतच आई उभी होती. मी तिच्याकडे धावलो. ती भाकरी ओवाळून टाकते टाकते तोच मी तिळा बिलगलो,

आणि यापुढे जवळ जवळ एक तप जिव्हाळ्याच्या माणसांच्या सटींसामासीं होणाऱ्या भेटीचे सुख आणि विरहांतीळ हुरहुर भरती- ओहोटीप्रमाणे माझे जीवन व्यापून होती.

....यापुढे मात्र गांवांतच नोकरी मिळाल्याने ही भरती-ओहोटी देशोधडीला लागणार होती.

-- आणि म्हणूनच मी अस्वस्थ झालो होतो.

पंचांगांत नसलेली यात्रा

पुण्यक्षेत्राचा महिमा यात्रेच्या लोकपट्टीने

मोजळा जात असल्यानें आणि नाशिक हें तर परम क्षेत्र, त्यामळे इथे खडोबाच्या यात्रेपासून एका तपाने भरणाऱ्या सिहस्थ-यात्रेपयत अनेक यात्रा ' लोकसंग्रह ! करतात. सुक्‍याबरोबर ओल्याने जळावे तसे दारच्या ठोकांबरोबर घरच्यांनाहि ,ह्या यात्रा ' साथे ! घडतात. परंतु या धबडग्यांत घरचे .लोक गुदमरतात. खरे म्हणजे घरच्यांसाठी कांही खास घरगुती असावें कीं नाहीं 2 आणि म्हणूनच एक यात्रा खास घरच्या लोकांसाठी भरते. मात्र व्यावहारिक ' अर्थे !? या यात्रेला लागू पडत नाहीं. म्हणूनच सदर यात्रेत मेवामिठाईचीं दुकाने नसतात किंवा खेळण्यांचीं दुकानेहि नसतात. मात्र ह्या यात्रेत कमळावर ' अनंत हस्ते ! : जीवन * भरीत असल्यानें ही यात्रा खरीखुरी चेतन्यमय असते. इतकेंच नव्हे तर दारच्या लोकांनीं गर्दी करून त्या चैतन्याचा बाजार करूं नये, म्हणून ह्या यात्रेची तिथीदेखीळ

बे शशवदूत ***4५-१५१-११११११-१५*१२-५११९-१-१५१-५२-१-१११२२१-१-११५१-५-११९१११4१२-११-१-१२२५२११-१५-१५५4१-१११-९१९९२-५१- 1

बाजारांत मिळणाऱ्या पंचांगांत दिळेळी नसते. मात्र तिथि निश्चित नसळी तरी ' नेमेचि येणाऱ्या ! पावसाळ्याबरोबर ही यात्राहे लवचिक नेमाने येते.

हवामानावरून पक्ष्यांनी क्रतु ओळखावा व्याप्रमाणें घरचीं माणसें : हुवापाण्या 'वरून ही यात्रा केव्हां भरणार ही गोष्ट ओळखतात. ती भरण्याच्या अगोदर एक-दीड दिवस संतत वर्षेचे धारानृत्य होतें. त्या धारानृत्याच्या पदन्यासावरून गांब मनांत उमजते कीं येणार ! नदीळा चांगलाच पूर येणार ! आणि हा संकेत पणे होतांच नदीकांठीं अनाहूत यात्रा भरते, ह्या यात्रेत वरखालीं होणारे रहाट- गाडगें नसते, तरी वरून खालीं पडणारा धबधबा असतो. लांकडी हत्ती-बोडे यांची डोळ्यांना भांवळ आणणारी चक्री नसळी तरी ज्याकडे पाहूनच भोवळ यावी अशी भोवर्‍्याची चक्री असते. पालांच्या दुकानांतन मिळणारे चहाचे पाणी नसळे तरी पुराच्या पाण्यांतत चहाचा ओघ, चाळू आहे असें वाटते आणि यात्रेकरितां रानाच्या वेळीं ब्राह्मणांनीं सांगितठेल्या मंत्रधोषाचा आवाज नसला, तरी पुराच्या खळखळाटाचा घनरव वृत्ति भारून टाकतो. खरे म्हणजे ह्या यात्रेचे यात्रेकरू म्हणून तुम्ही आलां कीं, दोन्ही डोळ्यांनी सरितेचे नानाविध विभ्रम पांखराच्या वृत्तीने टिपून घ्यायचे !

वास्तविक गांब तेथे नदी असेळच असे जरी नसले तरी नदी तेथें पूर असतोच ! मात्र नदी तेथे परर असूनहि पुरांच्या या ' उडदांमाजी $ नाशिक येथील गोदावरीचा पूर पाहिल्यावर ' काळे-गोरं ! निवडावे लागतें. हा पूर गंगा, सिंधु इत्यादि नद्यांच्या पुरांप्रमाणे वर्षांतून दोन वेळां येत नसळा किंवा भयंकर ! या विशेषणांत जरी तो उणा

के 21 7 डुॅस््‌गॅं्डंड ्क्क्क््ब्ब बॅ ३्स्क्म््ग्ब कबाब ऑड ्क्कॅमक&ख शरशावदूत

असला तरी त्याचें अंगसोष्टव इतके अनेकविध आहे कीं, पूर ओसरला तरी पुराची आठवण ओसरत नाहीं.

पुराने दुथडी भरून वाहणारी गोदावरी व्हिक्टोरिया पुळाखाळून जात असतांनाच तिच्या अंतरंग-बहिरंगांत जमीन-अस्मानाचा फरक पडतो. आतांपर्यंत गंभीर सौम्य मुद्रा असळेळी गोदावरी भाव- बंधनांतीलळ मालतीप्रमाणे दिसते. परंतु पुलाच्या चरणांचचा तिच्या : जीवनां ! प्रवेश होतांच तिचा ' जीवनीघ ' जादूची कांडी स्प्षाबी तद्वत्‌ पाळठटतो आणि मालतीचे खेळकर लतिकेत रूपांतर होऊन तिचा अलछुडपणा अंगप्रलंगांतून उलासेत होऊन वर उफाळून येतो. सूर मारून तळाशीं जावे आणि क्षणाधांत उफाळून वर यावें, त्याप्रमाणे पुलाच्या सांडव्यावरून केळीच्या खांबाप्रमाणे तकतकीत अंगाचा जलौघ सफाईने खालीं सूर मारतो आणि दुसर्‍याच क्षणीं तोंड वळवून पुलाच्या दिशेनें खळखळ करीत उसळून येतो. त्या वेळीं त्याळा जणूं काय खट्याळपणाचें कारंजे फुटते; खदखदणाऱ्या हास्याचा शुभ्र फेस येतो. प्रवाहाच्या उलट्या दिशेने उफाळण्याचा हा बेत नंतर बदलतो, आणि स्वतःभोवती ऱचार-पांच गिरक्या घेऊन तो गांधी तलावाच्या दिशेनें झेपावत जातो. तोच त्याला समोर गांधीजींची पवित्र स्मारक-ज्योत दिसते. त्या स्थितप्रज्ञ ज्योतीला अभिवादन करण्याकरितां तो प्रवाह आपले लाटांचे हात उंचावून जलतुषारांचे मौक्तिक तिच्या चरणीं अपण करतो आणि नंतर मंदिराला फेरी घातल्यागत डावीकडून तो रामकुडांत प्रवेशातो, तलावाच्या एका टोकाला महात्माजींची स्मारक-ज्योत तर दुसऱ्या टोकाला देवमामळेदार यशवंतराव महाराजांचें मंदिर !

शेशवदूत 4-*-२4*4०२4०४५३२५१५-५५२-११११५१११०९२-१५११२००५१-०-११-२०१५१-१०-५१-९१-५-०५-३५९१६ «०५११-१० ५-०५./.९-५.०-२५१.५- ध्द श्‌

चचहूंबाजूनीं वेढळेल्या पुराच्या पाण्यांत तें मंदिर कर कटेवरीं * ठेवलेल्या पांडुरंगाप्रमाणें दिसते. या दोन पुरुषोत्तमांना वंदन केल्यावर पूवाभिमुख असळेला तो प्रवाह रामकुंडांतन दक्षिणाभिमुख होऊन वाहूं लागतो. दक्षिणोत्तर असलेलीं घाटावरचीं छोटीं छोटीं मंदिरे तर केव्हांच त्याच्या जलपंखांत शिरलीं आहेत आणि तो दोन पुरुष उंचीचा सिमेट काँक्रीटचा बलभीमहि रामकुडांतन येणार्‍या ल्या पवित्र प्रवाहांत बुडाला !

व्हिक्टोरिया पुलावरून पुराच्या विश्वरूपदर्शीनाचा एवढाच भाग ठळकपणे दिसतो. तसें बघायचेंच म्हटलें म्हणजे नारा शांकराच्या मंदिरापयंतचा भागहि दिसतो, परंतु तें दृश्य बघण्याची खरी मौज कोटावरूनच ! प्रवाहाळा समांतर असलेला हा दक्षिणोत्तर कोट नाशकांतीळ नदीकांठच्या घरांना आपल्या खांद्यावर येऊन संरक्षितो आहे. इतका वेळ आपण पुलावर मध्यभागीं उभें राहून पुराचा जलोत्सव पाहत होतो. कोटावरून पहावयाचे म्हणजे एक प्रकारे नदीच्या तटावरून बघण्यासारखे होते. मात्र तादात्म्यावरून ताटस्थ्यावर जरी आलो तरी पूर बघण्याच्या आनेदांत थेबभरहिं उणेपणा नाहीं. वाड्ययानंद हा ताटस्थ्यानें होतो कीं तादात्म्याने होतो, याबाबत जरी मतभिन्नता असली तरी पूर पाहण्याचा आनंद हा जसा तादात्म्यांत आहे तसाच ताटस्थ्यांताहे आहे यांत मात्र मतैक्य आहे. नव्हे, दोन्ही ठिकाणांहून पूर पाहिल्याशेवाय पूर- यात्रेची परतताच होत नाहीं आणि म्हणूनच पुलावरच्या लोकांचा मेळावा कोटाकडे कोटाकडचा मेळावा पुलाकडे वळत असतो. कोटावरून बघावे तो पंचवटीच्या भाजीपटांगणांत पर ऐसपैस

रे -*२१-१२१-१५-९-१५३५-१-१-१--१-५-०-९-५-१4-१-१-९-१-५०५.

शोशवदूत

पसरला असून तेथील धमशाळांच्या पहिल्या मजल्यांत त्याने पाहुणे- पणान प्रवेश केळा आहे, दोन्ही तीरांवरीलळ गळीबोळांतन आगंतुक- पणे शिरळेल्या पुराची शोभा खाडीसारखी दिसत आहे. वास्तविक दोन्ही तीरांवर गांवाची वस्ती असलेल्या पुष्कळ नद्या आहेत. परंतु अगदीं ताटावर बसल्यागत दोन्ही तीरांवर घरे असलेली फक्त नाशिक-पंचवटी येथीळ गोदावरीच होय ! ह्या इथल्या प्रवाहाचे आणखी एक वैदिष्ट्य आहे : नदीच्या कांठावर असलेलीं देवळे पूर आला म्हणजे ऐन नदीप्रवाहांत दिसूं लागतात. त्यांच्या चहूं बाजूंनीं खेळणारे पुराचे पाणी पाहिल्यावर जलदुगींची स्माति होते. एका देवळाची रचना मुळीं पूर आळा म्हणजे ते मंदिरे पुराच्या पाण्यानें वेढळें जावे ह्या हेवत्तेच केळेली आहे. हें मंदिर मुके म्हणजे चारहि बाजूंकडून बेद आहे, मात्र चारहि भिंतींना पुरुषभर उंचीची संगम- वरी जाळी बसवळेळी असून खालीं चारहि बाजूंना एकेक सिंहमुख आहे, पुराचे पाणी आले म्हणजे संगमरवरी जाळींतनञ मंदिरांत जातं आंत असलेल्या समाधीला स्नान घाळून नतर ते पाणी सिड्मुखांतज्ञ बाहिर पडते.

प्रवाहांतल्या या मंदिरांचा सहवास पुराच्या पाण्याला सोडावासा वाटत नाहीं म्हणून कीं काय, ते पाणी किंचित्‌ पुढें जाऊन पुन्हां मंदिराकडे मागें वळते, तेथेच जरा घुटमळते, आणि मग नाइलाजाने पुढे सरते. पाणी चढतां चढतां थेट कोटावरहि आले म्हणायचे | आणि आतां तर एका प्रचंड लाटेने कोटावर पाणीच पाणी झालें. जणूं कांहीं कोटावर उभ्या असलेल्या असंख्य रसिकपुंडाळिकांभेटीं पुराच्या पाण्याचे हे परब्रह्म आलें ! परंतु परब्रह्म असलें म्हणून काय

शैशवदूत २१-4० १-१-५५६१-५११५१ १९११ ९३२-१-१-१-44-4-.२११ १५१२-५१-१५ १-१ 4१-२-१-५-५५-५-१-१-१-११-१११-१-५-९--५-२-१-१-१.२२११-५4-१-१-९ 1-1

झाले £ परब्रह्माळा आपले पाय लागूं नयेत म्हणून ते रसिक झटकन्‌ मागें सरळे. एवढेच नव्हे तर उलट ल्यांनींच तल्या परब्रह्माचे तीथे माथी घेतले, तोंच नेमक्‍या ह्याच क्षणीं नदींत घनगंभीर घंटारव कानीं आला, सगळ्यांनीं उत्सुकतेने त्या दिशेने पाहिळें, समोरच्या नारो शंकराच्या घेटेळा लाटांनी चुंबिळे होते. भाविक जन म्हणूं ळागळे की, आतां प्र ओसरणार ! आणि खरेच ! थोड्याच अवधींत श्रीकृष्णाच्या करंगळीचा स्पददे होतांच यमुनेनें ओसरावें तद्वत्‌ पुराचे पाणी ओसरूं लागले.

पुराच्या पाण्याचे हे बारीक-सारीक विभ्रम टिपायळा सारे गांव लोटले होते. नदीच्या दोन्ही तीरांवर यात्रा भरळी होती. निसर्ग आणि माणूस यांच्यांत दृष्टीने नातें जमळे होते. लौकिक यात्रेतील श्रीमंत-गरीब, उच्च-नीच हा भेद तेथे विरघळून गेळा होता. त्यांच्यांतठा माणूस फक्त शिल्लक राहिला होता. खरे म्हणजे ते सवे केव्हांच लौकिकाच्या पल्याड असलेल्या अलीकिकाच्या गांवी पोहोचले होते, त्या गांबी होते फक्त निसगाचे काव्य पाहणारे बदामी डोळे !

जरे. जरर

अ(न)पेक्षित आक्रोठा

जेव्हां अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडलास, तेव्हां माझ्या अंतरींच्या सप्त- पाताळांत दडी देऊन बसलेली विव्हळता बिळाप करीत वर उसळून आली आणि एक अस्फुट हुंदका माझ्या तोंडून बाहेर पडला. वास्तविक ह्या अस्फुट हुदक्याच्या स्वरूपांतदेखील तुझ्या मृत्यूचे दुःख होणार नव्हतें-नव्हे, व्हायला नको होतें. कारण हा तुझा मृत्यु तसा मुळींच अनपेक्षित नव्हता. उलट आम्ही जणूं ल्याची प्रतीक्षाच करीत होतों. अध्यो तपापूर्वी जेव्हां त्या मृत्यूने कॅन्सरच्या रूपानें सूक्ष्म परंतु अटळ पदक्षेप केला, व्हांच आम्हीं आमचा पराजय कबूल केला होता. तेव्हांपासून प्रत्येक क्षणाक्षणाला तो तुझ्या देहावर अधिकाधिक आक्रमण करीत येत होता. त्याच्या त्या क्रूर आक्रमणाने तुला होणाऱ्या यातना पाहून आमचा जीव तीळ तीळ तुटत असे. परंतु पुढें पुढें त्या यातना पाहून पाहून आमच्यांतील करुणा निढावली. ह्या

बे शषशावदूत मही केचे कक ककत ककव कद कक्कर कक किक केकेककक के १५

निढीवलेल्या अवस्थेतच ' तुझ्या ह्या यातना जर संपणार नसतील तर तं. तरी एकदांची संपून जा; म्हणजे तरी तुझी त्या यातनांपासून सुटका होईल ! असा उफराट्या काळजाचा विचारदेखील माझ्या मनांत घोळूं लागला होता. कारण मृत्यूशी चाललेल्या ह्या झटापटींत क्षणाक्षणाला त्याचाच विजय होत होता.

साहजिकच मरणाच्या दिशेनें वेगानें पडणारीं तुझी पावलें आम्ही रोखू शकणार नाहीं, याचा आम्हांला हतबल करणारा ग्रत्यय केव्हांच येऊन चुकला होता. मरणाकडे जाणाऱ्या तुझ्या पावलांना असहायतेनें साक्षी राहणे एवढेंच आमच्या हातीं राहिले होतें. यमधमोने फेकठेल्या कॅन्सरच्या जीवघेण्या जाळ्यांत तं प्रतिदिनी अधिकाधिक गुरफटत आहेस, हे उघड्या डोळ्यांनीं बघण्याखेरीज दुसरा उपचार राहिला नव्हता, ते जाळे तटातटा तोडून तुळा आमच्यांत परत आणावी, ही इच्छा कायमची वांझ ठरली होती.

सुरवाती-सुरवातीला ही असहायतेची जाणीव मनाला जाळीत असे. परंतु नंतर नंतर जळण्यासारखे अस कांहीं मजजवळ उरले नाहीं. त्यामुळें असहायतेच्या ज्वालांतील तप्तता जाणवेनाशी झाळी आणि त्या थंड- पणांतच ' नक्की जाणार ! ह्या प्रत्ययाचा चेक आम्हीं नाइला- जाने वटवून घेतला, त्या प्रत्ययाच्या प्रकाशांतच आम्ही एका वेगळ्या अर्थानें भयाण निर्विकारपणे तुझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करूं लागलो, आतां ' मरण हीच तुझी प्रकाति! ह्या वेदान्ती जाणिवेने आम्ही नित्याचे व्यवहार उपसूं लागलो, रात्रीं जरी बऱ्याच उशीरां- पर्यत मी तुझ्या उशाशी जागत बसत असलो, तरी सकाळीं उसन्या का होईना परंतु उल्हासानं कॅलिजमध्ये जाऊं लागलो. तेथें गेल्यावर

दोशवदूत

. द्द -९-० 4-*-€-१-९--९--१-१-९

कुणीं मित्राने तुझ्या प्रकतीविपयी नित्याचे प्रश्न विचारले म्हणजे मी : सुखदुःखे समे कृत्वा ! त्या गुळगुळीत प्रश्नांना काळचींच सपाट उत्तरे देऊं लागळो. एखादें विदोषण कमी अथवा जास्त. सरावाने पुढें पुढे मी चौकशीच्या चौकीत यांत्रिकतेने बाहेर निसटू लागलो. परंतु मधूनच केव्हां तरी ' तं खरेच जाणार तर-। च्या हुरहुरीच्या : काळी चार? वर विकळ जाणिवेचे बोट ठेवळे गेले म्हणजे माझ्या अंत:- करणांत केवढी तरी पोकळी निर्माण होई ! त्या पोकळींतन उमटू पाहणारा हुंदका आतां सारे गगन व्यापतो कीं काय, असे वाटत असे. परंतु दुसर्‍याच क्षणीं अन्य विपयांवरीळ चर्चेच्या उथळ खळखळाटांत तो हुंदका गुदमरून जाई.

कणाकणाने झिजल्यामुळे तुळा होणाऱ्या त्या असद्य कायिक, तशातच मानसिक यातना * तं गेळीस तर-!* ची भयाण जाणीव ह्यांचे दुःख मळा कधींच झालें नाहीं, असे मात्र नव्हे! परंतु दुःखाची ती धारदार कुठार रोज घाव घाळून घाळून बोथट झाली होती. रोजच्या स्पर्शाने तिची दाहकता शमली होती. क्षणाक्षणाला वर्धैमान होणाऱ्या तुझ्या शरीरांतील मृत्यूच्या अतिपरिचयाने त्याची अपरिहार्यता पटवून ध्यावी लागत होती.त्या अपरिहार्यतेच्या आधारावर तो जणूं कुटुंबांतीलळ एक सदस्य झाला होता. पाहुणेपणांतील परके- पणाची कात त्याने केव्हाच टाकून दिली होती. त्याची ती क्रूर आक्रमणशीलता ब'वून मी मनांत म्हणत असे-“ तो अटळ आहे, तो अटळ आहे!

त्यामुळे जरी मी वेद्यकीय उपचारांची कांस सोडली नव्हती, तरी त्या उपचारांनीं तुझी त्याच्यापासून सुटका होईल, अश्शी खोटी

ष्र शरावदूत -*-*-*--१-१-१-१-०५-१-१-५-१-५१-५१-१-९१-१-५०-९-१-५०१-१-९-१-१-१-१-१-१-१-१-१-१-१-१-५-५-५-५-१--५ *-५-५-१-५-६-.३.९-२-५---५-५-१--९.५-७ “1 १9

आशा मात्र बाळगली नाहीं. ही स्थिति केवळ माझ्या एकट्याचीच नव्हे तर घरांतील सगळ्यांचीच झाली होती. साहजिकच तुझ्या अंथरुणांतील मृत्यूला बिचकतां तुझ्या खोलींत कीं ब्रिजचा डाव रंगायचा तर कधीं काव्यश्ास्र - विनोद फुलायचा. लहानगी मंजू तर तुझ्या शेजारीं बसूनच परवच्याचे जिने धाडधाड चढून जात असे. त्या अनेकविध ऐहिक सुखांच्या कळकलाटांत मृत्यूची सुतकी गंभीरता अंथरुणांतच अंग चोरून बसली होती. कधीं कधीं तुझ्या उश्या- शेजारच्या ताज्या टवटवीत फळांकडे दृष्टि गेळी म्हणजे ह्या ताज्या रसरसलेल्या फळांच्या कांतीप्रमाणेच तुझ्या चेहऱ्यावर एके दिवशीं तजेला येईल, अशी लोभस आशा मनांत येई. परंतु दुसर्‍याच क्षणीं कॅन्सरची ती सवेभक्षक प्रकाते तक्षकासारखी त्या कोवळ्या आशेला निर्दय डंख मारी आणि मग एका विषण्ण छायेने माझे मन झांकोळून जाई; अंतरांतीळ सगळ्या कोमल वृत्ति करपून जात क॑कह्ननाळा एका भकास माळाचे अपरूप प्राप्त होई.

पुढे पुढे ती भकासताहि माझें रूपच झाळी. त्यामुळे त्यांतील कटुता शेवाळली, मग त्या शेवाळळेल्या मनाच्या दिग्दर्शनाखाठीं माझ्या शरीराची यंत्रणा व्यवस्थित सुरू होई. *

तंगेल्यानंतर कोणत्याहि प्रकारचे दुःख आम्हांला होऊं नये म्हणूनच कीं काय त्या कराल मृत्यूने अवरीअखेरीस नवीं नवीं अस्ते तुझ्या शरीरावर फेकून दुःखाची अंगप्रत्यंगे आम्हांला उलगडून दाखवायला सुरवात केली.

ज्या वाणीमुळे तुझ्या हृदयाशीं मी संवादी राहूं शकत होतों त्या वाणीवरच मृत्यूने एके दिवशीं घाळा घातला आणि तुझी बोलण्याची शक्ति हळूहळू क्षीण होऊ लागली, त्या वेळीं मीं मनांतल्या मनांत

*“"'* शेशवदूत

४८

किती आक्रंदन केळे म्हणन सांगूं ! छे ! छे! यापेक्षां तो पाषाण- हृदयी मृत्यु तुला एकदमच कां नेत नाहीं, असा विचार माझ्या मनांत तरळून गेला. परंतु दुसऱ्याच क्षणीं मीं त्या आततायी विचाराला दाबले, कारण अजून तं माझ्या हांकेळा ' ! द्यायचीस, सला क्षीण खरांत कां होईना परंतु आतुर हांक मारायचीस आणि त्याहिपेक्षां अधिक महत्त्वाचें म्हणजे तं. तुझ्या त्या निरागस नेत्रांतन माझ्यावर प्रेमवर्षीव करायचीस, त्या एकाच दृष्टिक्षेपांत मळा तुझ्या खेहाळ अंतःकरणाच्या अस्तित्वाची ओळख पटायची.

परंतु अखेरच्या पंधरा दिवसांत तर तोहि ठेवा हरपळा, तझ्या शरीरांत वस्तीस असलेल्या पंचमहाभूतांपैकी तेज ह्या महाभूतानें डोळ्यांच्या द्रवाजांतन प्रयाण केळे, आजपयंत त्या दृष्टितिजानें तुझ्या आत्म्याचे दीन घडविण्याची कामगिरी उचलली होती, त्यानेंच जेव्हां असा अंगचोरपणा केला, तेव्हां तुझे डोळे उघडे असूनहि दृष्टींचा भाव मात्र त्यांत राहिला नाहीं. त्या वेळीं मी ' तू कोठें आहेस १! असा मूक आक्रोश करूं लागलों, तुझ्या ह्या निर्विकार दृष्टीकडे पाहिल्यावर वाटे कीं, आतां खरेंच तं [हा पंजर सोडून गेळीस ! देह जिवन्त असूनहि ' त.” मात्र तेथें नव्हतीस, किती विचित्र जाणीव होती ती | परंतु तरीहि लौकिक दृष्ट्या अजून त॑ होतीस. इतके दिवस ज्या तुझ्या हातानें तूं माझ्या पाठीवरून मायेने हात फिरविलास, त्याच हाताकडे आतां पाहवत नव्हतें. तरीहि तो हात अजून तुझाच! आहे, याची जाणीव जीव धरून होती.

या नाहीं त्या प्रकाराने तं गेल्यानंतर जें दाहक दुःख होणार होते, त्या दुःखाचे सवे प्रकार तै. जाण्याच्या अगोदर अनुभवाला

खे शशावदूत -७-१-३-७-७-६-$--९-३-३-७-३-६-७-७-३--६-३-३-३-३-७-६-९-७-३-७-१-७-७-३-७-३---९-३-१-७-३-३-६-७-३-१-६-९-१-६-६-३-३-९-९७-३-६-३-९-१-१९-७-३-१-३-$ 1१8९

येऊन चुकळे, त्यांतील अनुभूतीहि निबर झाली, त्यामुळे जणूं कांहीं तुझे शारीरिक मरण आतां आम्ही प्रशांत आत्म्याने सहन करणार होतो. आणि खरेच, ह्या विचाराने मी तोडावर स्थितप्रज्ञता फांसून चारचौघांत राजरोसपणे हिंडू लागलो, सराइताम्रमाणे लोकांमध्यें जाऊन हास्यविनोदाचे मुखवटे घाळूं लागलो, त्या मुखवट्यांचा कांच जाणवेनासा झाळा, कारण कणाकणाने झालेल्या आजपर्यंतच्या दुःखाने माझें संवेदनाध्तम अतःकरण खरेच बघिर भासूं लागले होतें. जणू कांहीं तुझा हा उरला-सुरला देह गेल्यावर स्फुंदूनस्फुवून रडावे, असळे कोठलेहि स्पंदन आतां त्या बघिर हृदयांत होणार नव्हते. आणि म्हणूनच 'त॑ आज ना उद्यां जाणार! ह्या आध्यात्मिक तटस्थतेने मी तुझ्या त्या शरीराकडे पाहूं लागलों.

प्रत्यक्षांत तं, जेव्हां खरेच गेळीस तेव्हां मात्र हे सारें तत्त्वक्ञान मेणाच्या घराप्रमाणे वितळून गेळे, घुगघुगत्या खरूपांत का होईना जी तं, होतीस तीहि आतां उरली नाहींस, ह्या एकाच जाणिवेनें माझे मन उमसून उमसून आक्रंदूं लागले, तुझ्या त्या जाण्यानें ह्या भरल्या विश्वांत क्षणांत पोकळी निमोण झाली आणि मौी त्यांत पोरकेपणाच्या व्यथेने जळूं लागलो. भर दुपारी प्रकाशाला अचानक भोंबळ येऊन जिकडे तिकडे अंधाराचे साम्राज्य माजळे आणि मी त्यांत कुणाच्या तरी आधारास्तव चांचपडू लागलो. फुललेल्या प्रसनतेला मरगळ येऊन एक विषण्ण अवकळा सृष्टीवर लाव्हारसा- प्रमाणे पसरू लागली, ' जाणारच? हा पाठ केलेला धडा मी क्षणाघांत विसरळो * आणि तं. अशी गेठीस तरी कोठें £ ! ह्या एकाच मंत्राचा विकळ रवाने घोष करूं लागलो.

शे.

ब्ऊे ष्ठ -५५-१-१-१-५--१-१५-१-०-५-१-१-९-३-१-५-१-१-९-९-१-९५-१-१५१-५१-६-१-१-१५-९१-१-९-९-९५१-१-९५-९५१-९-९-१-१-१-९--९-९-१०-३-१-१-१-१--१--५-५ रादावदूत

आजवरच्या आर्‍चारविचारांनीं हा आक्रोड अगदींच अनपेक्षित ठरत होता. त्या आचारविचारांतून उद्‌भवलेल्या तत्त्वज्ञानाशी हे विकल आक्रंदन विसंवादी हात होते. परंतु तसें तरी कसे म्हणावे 2 कारण जें पटळें होते ते बुद्धीला, भावनेला नव्हे | म्हणून जरी हा आक्रोश अनपेक्षित असळा तरी तो तकोला-प्रेमाला नव्हे! उलट तो आक्रोश हृदयाच्या भावविश्वाशीं प्रणेपणे सुसंवादीच होता. _ विश्वाचे संपरणे रहस्य उमजलेल्या योगी निवृत्तिनाथांनीं ज्ञानेश्वरांच्या समाविप्रसगीं असेच अ(न)पेक्षित अश्रविमोचन केलें नव्हतं काय !

जेव्हां मोठे लहान होतात....

दोन दिवसांचे पाहुणेपण संपल्यावर मी परत निघालो, वडीळ माणसांचा निरोप घेतांना औपचारिकपणाची परीटघडी बरीचशी टिकून होती. परंतु लहान मुलांचा निरोप घेतांना अंतःकरणांत कालवाकालव झाली, त्यांच्या सहवासाची ख्िग्धता तरळत असतांनाच विरहाची व्याकुळता दाटू लागली, निरोपाचा ' येतों? हा शब्द उच्चारण्याइतकाहि उपचाराचा परकेपणा राहिल्याने मीं केवळ सांद्र स्मिताने त्यांचा निरोप घेतळा, तोच औपचारिकपणा चोंबडेपणाने म्हणाला : निघतांना लहान मुलांना खाऊला पैसे द्यायची एक रीत असते ! /' नकळत माझा हात यांत्रिकतेनं खिश्यांत गेला, परंतु दुसऱ्याच क्षणीं कांहीं एका कृतज्ञ भावनेने उरल्यासुरल्या उपचाराचे बंधन झुगारून पैसेन काढतांच रिक्‍त हात बाहेर आळा, आणि मी तसाच चाळूं लागलो. असें करण्यांत मी लहानपणीं पाहुण्यांच्या निमित्ताने अनुभव- ठेल्या आनंदा्शी खचितच कृतघ्नपणा करीत होतो---

**-१२४५१4१)०-२-.१३२-१३१.१4१4->२१२११५4.-३-३२-२११२-५.३२.५-१-१-१-१-५-३१-१-०-३-३-३-३-३७ दो दावदूत

र्ट “4 4-९ *-२--९५-५१-०-१-५

लहानपणीं शाळेला सुटी मिळण्याची जीं अनेक निमित्ते असत, त्यांत ' पाहुणे ह्या निमित्ताठा माझ्या दृष्टीने फार मोठे महत्त्व होतें. पाहूणे आठे म्हणजे सुटी मिळते ह्या घवघवीत फायद्यामुळे रोज शाळेत पाठविणाऱ्या आई-वडिलांपेक्षां मठा पाहुणेच आवडत. घरचीं माणसे ' पाहुणे ! ह्या विषयावर कधीं कधीं प्रतिकूळ बोळत त्या वेळीं तर मला त्या बिचाऱ्या पाहुण्यांबद्दह फारच सहानुभूति वाटत असे ! प्रारंभीं प्रारंभीं फक्त सुटी देण्याच्या सामथ्यींचे बळयच पाहुण्यांभोवतीं आहे, अशी माझी समजूत होती. परंतु नंतर वाढल्या वयाबरोबर मला पैशांची किमया समजूं ठागळी, आणि पाहुण्यांना शैक्षणिक अर्थाबरोबरच व्यावहारिक ' अथे! हि असतो, याचा प्रत्यय आठा ! एका दिडकींत खिसा भरून फुटाणे येतात हा शोध अंग- वळणीं पडला, पाहुण्यांकडून मिळाळेळे पैस आईच्या बँकेत सांठवून वेळी-अवेळीं मी तिच्याकडे शिळकेबाबत विचारपूस करूं लागलो. एकदां माझ्या ठेवींतळे पैस मळा विचारतां वापरळे म्हणून मी तिच्याविरुद्ध बाबांकडे फियादसुद्धां केळी, पाहुण्यांच्या ह्या आर्थिक गुणांवर मी इतका ळुब्ध होतो कीं, घरांतील माणसें एका अर्थानें तर मी दुसऱ्या अर्थाने पाहुण्यांच्या जाण्याच्या वेळेची प्रतीक्षा मोठ्या आतुरतेने करीत असे |! जातांना ते ज्या अर्था मलाच पैसे देतात आणि ज्या वडील माणसांनीं त्यांचे एवढे आदरातिथ्य केलें त्यांना एक दिंडकीसुद्धां देत नाहींत, त्या अर्थी मी कुणीतरी मोठा माणूस असलों पाहिजे, असा दाट संशय येई. मात्र मी जसजसा मोठा होऊं लागलो, तसतसा माझ्यांतळा मोठेपणा पाहुण्यांना दिसैनासा झाळा कीं काय कोण जाणे ! कारण

बळे .-]। शवदूत १५५५५५५५५५११५५५५१५९१५५५५५५५९५५११५५५५५१११५५५५१५५५५५५***०५५५१****-*«

माझ्या लहान भावंडांना पैसे मिळत त्या वेळीं कधीं कधीं मला बगळण्यांत येऊं ळागळे | तेव्हां मात्र मी मोठा होत चालल्याबद्दल मळा फारच वाईट वाटूं ठागलें. मी देव्हाऱ्यांतील देवाला पुष्कळदां विनबिळे कीं, ' देवा, मळा मोठा करून पाहुण्यांना दिसणारा माझ्यांतीळ मोठेपणा नाहींसा करूनकोस ! ' परंतु नैवेद्याप्रमाणेच ह्याहि बिनवणींची दाद लागली नसावी. त्यामुळे मला माझ्या इच्छे- विरुद्ध मोठे व्हावे लागले.

हा अनुभव जमेस असल्याने जेव्हां मळा पाहुणा म्हणून एके ठिकाणीं जाण्याचा पहिला प्रसंग आला तेव्हां सुटी देण्याचे दामाजींचें अशीं दोन सामर्थ्ये माझ्या अंगीं वसतीस आल्याने मी खुषींत आलो.

प्रत्यक्ष पाहुणा म्हणून हजर झाल्यावर मळा आढळून आलें कीं, तो दिवस नेमका सुटीचा निघाळा. माझे पहिलें सामध्ये असे वापरल्याशिवाय निमोल्य झाळेळें पाहून माझ्या मोठेपणाचा थोडासा हिरमोड झाला, म्हटळे, याचे उट्टे जाण्याच्या वेळीं दामाजीचा अवतार दशेवून मोठेपणाची प्रौढी मिरविण्यांत भरून काढूं !

बाबालोकांनीं जरी प्रथमच माझ्या अंगावरची मोठेपणाची झूल वरील रीतीनें काढून घेतळी तरी त्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून कीं काय घरच्या वडील मंडळींनीं माझ्या अंगावर औपचारिक मोठे- पणाचीं वस्रे तत्परतेने चढविलीं. मी आतां एम्‌. ए. ला आहे, हे ऐकून “अरे वा!!! चा कोतुकोद॒गार काढला तेव्हांच आमचा देहरथ जमिनीपासून दोन अंगुळे वर उचळला गेला, तशांत मी नोकरीचा घाणा ओढून अभ्यासाचा ' अबब ! करायला लावणारा प्रचंड व्याप उपश्ीत आहे, हे ऐकल्यावर ह्यांच्या चेहर्‍यावर

षक “| 4 &*4*..4.4१०२४-१-१-९१४५-4२१११ १०१4१५ ४५-२५ १०-११ ९१२ ९-१-*4१ १-*44११९१ १९१4-१२ ९४३ -०-०-* ४-९ २२-२-९-५-३-३-३-.०-५- शरशावदूत

उमटळेल्या ' अग बाई | ! च्या आश्चर्यांभिनयानें माझ्या मोठेपणाच्या होसेळा ठांबळचक ढेकर आली !

मोठेपणाळा हपापळेल्या माझ्या वृत्तींना ह्या शाब्दिक उप चारांच्या सोहळ्यांत मुलांना सुटी देणाऱ्या मोठेपणाच्या अभावाचे शल्य खुपेनासे झाले, इतकेच नव्हे तर त्या कैफांत मी लहान मुळांना विसरूनदेखीळ गेळो, दुपारीं जेवण झाल्यावर मझ््याची चव तोडांत घोळवीत मी बैठकीवर सैळपणे लोळत पडलो, घरांतळीं यजमान मंडळी मठा विश्रांति देण्याकरितां घरांत गायब झाळीं, घरांत दोन प्रहरची सुस्त शांतता आळस देत पसरली, नेमकी हीच वेळ साधून घरांतील बाळगोपालांनीं दबकत दबकत दिवाणखान्यांत प्रवेश केला. त्या त्रिकुटामध्ये एक सात-आठ वर्षाचा मुलगा त्याच्या वयाच्या दोन्ही अंगांना समास सोडलेल्या वयाच्या दोन मुली होल्या, दिवाणखान्यांत रेगाळणारीं त्यांचीं पावळे मळा पाहतांच ओसरीकडे वळूं ठागठीं | छे! छे! हा तर सरळ सरळ माझा अपमान होता, एवढा मोठा माणूस तेथे हजर असतांना त्याच्याकडे दुलक्ष करून ही मंडळी पुढे जाते ह्याचा अर्थ काय! नाहीं, कौतुकाची विचारपूस तर नाहीं; परंतु निदान कोतुकाने तरी त्यांनीं माझ्याकडे बघायला काय हरकत होती अगदीं अज्ञजन म्हणून सोडून दिलें तरी मी त्यांना जातांना खाऊळा पैसे देणार होतो, त्या वूरदृष्टीनें तरी त्यांनीं माझ्या मोठेपणाळा मुजरा करायळा हवा होता ! म्हटले, त्यांना अगोदर आपल्या मोठेपणाचे विश्वरूपदर्शन घडवूं म्हणजे तीं मुळें आपोआपच मला मान देतील, ह्या उद्देशाने मीं त्यांना ' शुक शुक ! करून आमंत्रण दिलें.

के डादा दूत “२२4५-२१-११ ४५११-२५.१-३२4-4.4-4-११५-१५4५-५-११५4५-११-4५-५१५३-५०३4-०4-4-.०-२-१२१-५-१-१-१-.२२-९-५4५-4-44-.)-.-4-.-२५१-.4-.-.-५-4५-२-4.५-१-१.५ र्ड षद

माझ्या आमंत्रणाचा स्वीकार करावा कीं करावा, या संभ्रमांत तीं मुळे क्षण दोन क्षण घुटमळलीं आणि मग हळूंहळूं माझ्याकडे येऊं लागलीं. मी मनांतल्या मनांत म्हणाली कीं, याचे नांव मोठेपणा ! उगाच नाहीं नुसत्या : थुक शकू ! वर तीं मुले इकडे वळलीं !

तीं मुळे जवळ आल्यावर मात्र पंचाईत आठी. यांना माझा मोठे- पणा दाखवायचा म्हणजे काय करावे, ते मला नीट समजेना ! बरे, त्यांच्यासारखेच क्षुलुक विषयावर बोळावे तर मग मोठेपणाळा काय अर्थे उरला १? माझा मोठेपणा याप्रमाणे लक्ष्मणरेषेसारखा आमच्यांत बोलण्याचालण्याचे दळणवळण घडटूं देईना, अखेर त्यांची निरागसता मळा इतकी मोहक वाटली कीं, मी मोठेपणाची लक्ष्मणरेषा ओलांडून त्यांच्या ठह्ाानपणाळा जाऊन मिळाला. प्रवेश करतांना परवलीचा शब्द म्हणून मीं त्यांना लबाड कोल्ह्याची गोष्ट सांगितली. त्या गोष्टींतीलळ लबाड कोल्ह्याच्या फजितीळा ती मुळे जेव्हां खळखळून हेसलीं तेव्हां त्या हंसण्याच्या खळखळाटांत मीं माझ्या मोठेपणाच्या चाकोरीत आक्रसठेल्या वृत्ति उल्हसित केल्या. त्या उल्हसलेल्या वृत्तिपखांनी पंचविसाव्या वर्षावरून घूमजाव केळा आणि मी मुलांना समेवर येऊन मिळाली, तेव्हां मनाचे होद उल्हासाने भरून वाहूं लागळे. साहजिकच त्यांनीं सांगितठेल्या लहानसहान गमती रसाने थबथबलठेल्या वाटल्या, त्या रसमय अवस्थेत जेव्हां आम्ही सर्वेजण बाहेर फिरायला निघालो तेव्हां दुपारचें ऊन चांदणे होऊन सामोरं आलें. त्यांच्या घरापासून जवळच घरण होतें. तें धरण दाखवायला त्यांनीं मळा नेळे. वाटेत रस्त्यावरच्या वेड्या बाभळीची ओळख करून दिली. त्यांच्या बाहुलाबाहुलीचें लग्न ज्या आंब्याच्या झाडा-

> श्री » 6० हे 1. चु /

शेदा द्‌ “७-१-३-३-७--क--क-$-१-७-३--१---६-७-१-९-३-७-६-३-७-३-३-९-९-३-१-७-९-९-७-१-६--६-१-१-१-३-७-३-३-१-७-७-३---१-६-३-१-७-३-७-३-७-१-३-३-३-७ > | द्‌त

वालीं होते, ते झाड दाखविळे, दुरून दिसणारी धरणाच्या ध्यभागींची डोठकाठी गुळगुळीत डोक्यावरच्या शेडीसारखी दिसते ॥ीं नाहीं म्हणून प्रश्न अशा लाडिकपणांत विचारला कीं, मी अरे ॥, खरंच कीं ! ! म्हणूनच उद्गारलो. कांठावर गेल्यावर भाकऱ्यांचा वेळ खेळळो, त्या खेळाने पोट भरल्यावर पाण्यांत पाय सोडन बसलों.

नंतर दिवसभरांत दुसर्‍या दिवशीहि आम्हांला परस्परांचा ळा लागला, ' परस्परांचा परस्परांना * असें म्हणण्यापेक्षां मलाच गांचा लागळा म्हणणे वास्तव ठरेल ! त्या लळ्यानें मी माझे पाहुणे- हरपून बसलो. अहंकाराने घातळेलीं उपचारांची कोळिप्टके झडून लीं आणि कोंडलेल्या निभर भावना झुळूझुळू वाहूं लागल्या. मन- कळ्या हास्याची कारंजीं उसळलीं. उपचारांच्या घट्ट्यांनीं निबर ॥लेल्या चेहऱ्यावर संवेदनाचे विभ्रम पदन्यास करूं लागले. डोळ्यांनी भीरतेची कात टाकली. त्यांत कोमळ लुसलुशीत भाव तरळू ॥गठे. जिकडे तिकडे एका अनामिक प्रसनतेचे मळे मोहरून आले.

अश्या अनुभूतीशीं कृतक्ष राहण्याकरितांच मीं खाऊला पैसे ण्याच्या उपचाराचे बंधन पाळळलें नाहीं. त॑ उपचार-बंधन पाळणें णजे मीं पुन्हा पाहुणेपणाचा मुखवटा घारण करणें होय. परंतु [हुणेपण तर केव्हांच देशोधडीला लागळें होतें. हें सवे आचरण दाचित्‌ लहानपणी अनुभवलेल्या आनंदाशीं कृतध्नपणाचें असेल; (तु ती कृतध्नता विघायक होती. त्यामुळे नव्या चैतन्यदायी नुभूतीशीं कृतज्ञता ठेवळी जात होती. मी जर मोठा राहूनच परत [|घाळो असतो तर कदाचित्‌ तें उपचाराचें ओझे डोक्यावर बाळगले सतें. परतु मी आतां लहान झालों होतो..... रि

ही. जर

नवी शाळा

अस्ताव्यस्त सामानाची व्यवस्थित बांधाबांध

करीत असतांनाच माझा मित्र नारदमुनी- सारखा हजर झाला, एकंदर रागरंग ओळखूनहि त्यानें मळा संथपणें प्राथमिक खरूपाचाच प्रश्न विचारला ; ' कुठं निघालास ?

प्रवासालळा-_-

: प्रवासाला १? कशाकारितां १! : सहज !

: सहज?

झालें ! ज्या प्रकाराला मी भीत होतों तो प्रकार अखेर घडलाच! माझी अशी इच्छा होती कीं, माझ्या प्रस्तुत प्रवासाची इतरांनीं कारणपरंपरा शोधूं नये. मळा माहीत आहे कीं, प्रवासाठा कांहीं तरी कारण हवे असतें. बदलत्या क्रतुमानाप्रमाणे आणि निमाण होणाऱ्या कौटुंबिक गरजांप्रमाणे हीं कारणें अनेकविध असूं शकतात, वासंतिक क्रतंत झेपणाऱ्या अहेराची फी देऊन कुणाच्या तरी लग्नांत

ब्टड 4 --१-१-९-५-५-५-९-२-१-१-१-१-१-९-५१-१-१-१-१-१-१-१-९ १-९-५.4-५-4-१-१-१-९-१--५-१-१-१-१-१-१-९-१-५-१-१-१-१-१-९-१-१-१-१-१-१-९-१-९-१-५-९-९-१-१-९ शशावदूत

स्वतःची आबाळ करून ध्यायळा, वषीक्रतंत पंढरीनाथाच्या भेटीकरितां चंद्रभागेच्या कांठीं पावसांत मिजायळा किंवा शारदृक्रतूंत सासुर- वाडीला जाऊन काकासाहेब गाडगीळांच्या तिखटमिठाच्या करंञ्या- पुऱ्या खाऊन जटरागम्रि शामवायळा माणसे स्वतःच्या गांबाहून दुज्या गावाळा जातात.

वयोमानाप्रमाणे प्रवास-कारणांत फरक पडतो. बालळवयांतीळ सहळीपासून तो उतारवयांतीलळ काशीयात्रांपपंत अनेक कारणें माणसाच्या प्रवासी वृत्तीला साद घाळीत असतात. परंतु दर वेळेला प्रवासाच्या मागे हेतुसशोधनाचा पोळिसी ससेमिरा असल्याने प्रवासाचा निभर आनंद देशोधडीला लागत असतो.

परंतु वरीळ सवे सनातन कोटुंबिक करणांना डावळून मी जेव्हां * सहज ! ह्या होतकरू निमित्ताचे बोट धरून प्रवासाला जातों म्हणून म्हणालो, तेव्हां तो सर्वे प्रकार माझ्या मित्राच्या दृष्टीनें पोरकटपणाचा होत होता. सहज! हे कारण कांहीं पुरेसे पोक्त नाही, याची मळाहि जाणीव झाळी आणि मी अखस्थ झालो. ह्या अखस्थपणांत मित्राच्या अविक लांबट चेहर्‍याच्या अभिनयाने भर पडूं नये म्हणून मी ' सहज! हे खरे कारण लपवून कुठल्या तरी काल्पनिक खोट्याच कारणाच्या परवलीचा शब्द मित्राच्या तोंडावर फेकळा आणि 'चौकशीच्या चौकींतन पसार झालो. पहिळें खोटें ळपविण्याकरितां दुसर्‍यांदां खोटें बोलावें लागतें, ह्याचा अथे मी समज शकतो. परंतु पहिलें खरें बोलठेठेंहि ळपविण्याकरितां खोटे बोलण्याचा प्रसंग मजवर आलेला पाहून मी भांबावून गेलो !

बफे शहावदू **२२१4-९९९११२-१-५-५१-१-१-१-१५३१-१५११

माझ्या: सहज! प्रवासाठा जसे कौटुंबिक कारणांचे पाठबळ नव्हते, तसाच ' केल्याने देशाटन पंडितमैत्री सभत संचार! ह्या सुभाषिताचाहिं आधार नव्हता ! वास्तविक त्या सुभाषिताचा मुकुट घाळून प्रसंगोपात्त मींहि प्रवास केळेळा आहे, परंतु त्याहि वेळीं ' गड आला पण सिंह गेळा ! ह्या न्यायाने ' पंडितमेत्री, सभत संचार ! ह्यांच्या पोशाखी लाभांत देशाटनामुळे येणाऱ्या इतर कांहीं मानवी भावनाच्या ग्रत्ययाचा सिंह गमवावा ळागत असे. एक वेळ ' पंडितमैत्री ! परवडली, पण नको तो ' सभेत संचार ', असे फार वेळां होत असतें. ' पंडितमैत्री एकाच इसमाशीं संग असल्यानें पोशाखी आचारविचारांचीं कवचकंडळें घाळून थोड्याच वेळांत स्वतःची सुटका करून घेतां येते. परंतु * सभेत संचार ! करण्याच्या वेळीं असंख्य लोकांशीं वागतांना धारण कराव्या लागणाऱ्या कृत्रिम हास्याच्या; उथळ चौकशीच्या, अळवावरच्या पाण्याप्रमाणे त्यांच्यांत राहून परस्परांच्या भावनांचा मिळाफ होऊं देणाऱ्या प्रतिष्ठित अदबीच्या मुखवट्यांनीं माझा जीव अक्षरशः: गुदमरून जाई! माणूस हा कळप करून राहणारा प्राणी आहे! ह्या व्याख्येतीळ तोटा तेव्हां मळा प्रकषाने जाणवत असे. त्या कळपांत वागतांना खतःचे आचारविचार हे आत्माविष्काराठा अनुसरतां दुसऱ्याच्या पसंती-नापसंतीच्या इशाऱ्याबरहुकूम होतांना पाहून प्रवासाच्या पंडितमैत्री ! इत्यादि फळांइतक्याच दुसर्‍या महत्त्वाच्या लाभाचा दिवसांढवळ्या खून झालेला पहावा लागे. होय, प्रवास करतांना माझ्या अंतश्वक्षंसमोर दुसराहि एक लाभ असे.

बळे द्‌ ****१*१*९१११-५५५१११-५५-११५-१५-१५३-५५५२५५-१५-५५५५-५५-३५५-१५१५-५५५-५५५९-५-५५५-९१५२१-५५१-५१-५५-०११५०-२ शशववूत

त्या लाभाचा परीस माझ्या मनाळा स्पशेतांच माझ्यावरील औपचारिकपणाचचा गंज उडून जात असे. स्वतःच्या गांवांत राहून माझ्या मनावर उपचारांच्या शेंदराचे इतके थर चढलेळे असत कीं, मूळची माझी प्रकाते आंत अवघडून बसलेली असे. त्यामुळे रोजच्या आचारविचारांमागची उत्कटता मळूळ होई. साहजिकच शुष्क अभिनयावर भागवावे लागे. त्यामुळे गांवांत रस्त्यावरून कधीं दिळछुलळासपणे गळा मोकळा करून बोलतां किंवा खळखळून हंसतां येत नव्हते. रस्त्यावरीळ ओळखीच्या प्रतिष्ठित दृष्टीच्या पहाऱ्यामुळें कुठल्याहि मानवी सौदर्याकडे डोळे भरून पाहण्याला मी मुकलो होतों. तसेच त्याच ओळखीच्या धूमकेतच्या धसक्याने हॉटेलमध्ये शिरतांना सिंहावलोकन आणि दूरदृष्टि ह्यांच्या कुबड्या ध्याव्या लागत असत.

ह्या सवे बंधनांमुळे स्वत:च्या गांवांत स्वतंत्र असून परतंत्रा- सारखें वागावे लागत असतें, संवेदनक्वम भावनांचा प्रफुलित पुष्पवृक्ष मनांत असून त्याचा आस्वाद घेतां आल्याने एक प्रकारच्या पोरकेपणाची कळा माझ्यावर पसरते.

आणि म्हणूनच मग मी एके दिवशीं कुठल्या तरी वूरच्या अनोळखी ठिकाणीं प्रवासाला जातो. त्या ठिकाणी गेल्यावर रामाच्या पदस्प्याने शापित अहल्या जिवंत व्हावी, तद्वत माझ्या शिलावत्‌ झाठेल्या अनेकविध भावना फुलारतात, माणूस म्हणून जगण्याच्या संधीने माझें मन हिरवे होते. त्या अनोळखी ठिकाणीं माझें ठौकिक बिरुद-सामाजिक खऱ्या वा खोट्या प्रतिष्ठेचे-गळून' पडते; इतकेच नव्हे तर या साडेतीन हातांच्या देहाला बाराव्या दिवसापासून

डो शवदूत -७-१-९-६-६-६-६-३-१-१-३-६-१-३-६-१--१-$-९७-७--६-७-१-१-१-१-१-६-१--६-१-६-३-६-३-३-३-३-$--६-३-६-३-७-३-$-३-३-९-३-३-१-६-३-१-१-३-३-३-७-$-३-३ द्‌ 4

चिकटवळेळे नामाभिधानहि निर्थक ठरते आणि अक्षरशः पंचमहा- भूतांचा पुत्र म्हणून मी तेथे हिंडतो.

ते अनोळखी ठिकाण गर्दीच शहर असेल तर मी रस्त्याने रेंगाळत जात जात मानवांचे प्रसाधन पांखराच्या वृत्तीने टिपून घेतो. घड्याळाच्या पोळिसी हातवाऱ्यांच्या इश्ाय्यावर होणाऱ्या जेवण, झोप इत्यादि कार्यक्रमांतील कृत्रिमतेची कात टाकतो आणि शरीरघमाशीं प्रामाणिक राहता. रस्त्याने शीळ घाळीत हिंडतो. पुरभय्याकडून पाणीपुरी निःसंकोच मनाने खातो. सभोवार गर्दीचे गजबजते जीवन असूनसुद्धा मी पक्मपत्रापमा्णे अलिप्त राहून औपचारिकपणाचा स्पर्श होऊं देत नाहीं. किंवा त॑ अनोळखी ठिकाण निसगेरम्य असेल, तर त्या निसगाच्या नंदनवनांत हिंडतांना मी कधीं सूर्यफूळ होऊन सूयाकडे टक लावून पाहतो, तर कधी अवखळ, वारा होऊन वृक्षवेळींना गुदगुदल्या करतों. त्या वेळीं तीं कशीं खळखळून हसतात |! कधीं कोकीळ होऊन ' तं. कोठें आहेस तूं कोठे आहेस ' अशी आते अनामिक साद घालतो, तर कधीं बालकवींचा ओदुंबर होऊन पाण्यांत पाय सोडून बसतो. कधीं मर्ढकरांच्या चातक-चोचीने वर्षी-कतु पितो, तर कधीं तृणपणीवर दंवबिदु होऊन इंद्रघनूचे रंग खुलवीत बसतों. ह्या नाहीं त्या रूपानें मी पुन्हा पंचमहाभूतांच्या अनेकविध स्वरूपांत बिळीन होतों.

लहानपणीं शाळेंत जातांना रेगाळत जायला, रस्त्याच्या बाजूळा रंगांत आलेला गारुड्याचा खेळ पहायला सक्त मनाई असे. तेव्हां मी माझी समजूत घालीत असें कीं, शाळेच्या ह्या तुरुंगांतन बाहेर

पडल्यावर ह्या विधिनिषधांच्या सांखळ्या गळून पडतील, परंतु मोठा

डे 4 *-* *३-९९५६-९-१-१-१-६-१-१-१-१-६-९-१-१-७-९९-१-१ १३ ९-९१--९-३-३ शरावदूत

झाल्यावर उलट संभावितपणाच्या चौकटींत अडकून बसलो आणि लहानपणाच्या त्या अतृप्त इच्छा तशाच राहिल्या. आणि म्हणूनच मीं मग ही ' सहज! प्रवासाची नवी शाळा शोधून काढली. जुन्या शाळेंत सकल इंद्रियांना पडठेळें कृत्रिम वळण विसरणे एवढेच फक्त नव्या शाळेत शिकायचे होते. नवें मात्र कांहींच शिकायचे नव्ह्ते. कृष्णमूर्ति म्हणतात त्याप्रमाणे पांखराच्या वृत्तीने, निभरतेनें जीवन जगायचे होतें.

ज्ञानेश्‍वरांची मित्रकल्पना

मानवी जीवनांत रक्तासिद्ध नात्यांची जितकी गरज, तितकीच, किंबहुना त्याहूनह्दि अधिक गरज भावजन्य नाल्यांची असते. दुसऱ्यांशीं संबंध जोडणे म्हणजेच जीवन, हें जर त्रिकालाबाधित मूल्य असेल तर माणसाला दुसऱ्याशीं ह्या नाहीं त्या नात्याने खतःला जोडून घेतल्याशिवाय जीवन- साथेकता आणि संपूर्णता लाभत नाहीं. खरें म्हणजे माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या जीवनांत नाते जन्मते. * सहज ! रूपांतील ह्या नातेसंबंधांत आई, बाप, भाऊ, बहीण, मावशी इत्यादि अनेकविध भूमिकांतील व्यक्तींशी तो संबंधित होतो. त्या नात्यांच्या ऊनसावलींत त्याचे भावजीवन तुष्ट आणि पुष्ट होऊं लागतें. परंतु ह्या सवे रक्तबद्ध नात्यांची पाठराखण असूनहि मानवाला दुसऱ्याच एका अबोध नात्याची भूक लागते. ह्या अबोध नाल्याच्या गरजेची अपरिहायेता त्याला अगदीं लहानपणापासूनच जाणवत

ल्क "१ -! --९-९५-९-१-५-९ ९-१-१-९-१-१-१-९-९ ९-१-१-१-१-१-१-१-१-१-९-१-१-१-१-१-१-१-१-१-१-५५-९-१-६-१-१-१-१-१-१-१-१--१-१-१-९-१-१-१-१-१-१-१-१-१-१--१-२ शशावदूत

असते. आणि तो आपल्या समान-वय-गुण-घर्मी व्यक्तींचा शोध करीत असतो. दिवसांतळा बराचसा भाग त्यांच्या सहवासांत घालवीत असतो. हा शोब बहुशः समानवयी व्यक्तींमध्ये लागत असला तरी कवीं कधीं वयाचे बंधन गळून पडते. ' उत्तरराम- न्चीरेतां तीळ कुमार ळवाळला प्रौढ रामाच्या प्रथमदर्शनांत हा खेहशोध लागतो आणि त्याच्या तोडून उद्गार बाहेर पडतात कीं --

भाश्वाससेहभक्तीनामेकमायतनं महत्‌

प्रकृष्टस्येव घमेस्य प्रसादो मूर्तिसुन्दरः

एक व्याक्ते दुसर्‍या व्यक्तीशी संबंवित होतांना त्या संबंधांत कोणकोणत्या भावनांचे रज्जु असतात, ह्याचा निर्देश करतांना वरील छोकांत भवभूतीने स्नेहरज्जूचचाहि आवजून उल्लेख केला आहे. वडिलांविषयीं मुलाच्या मनांत आदर, भाक्ति ह्या भावना असल्या

तरी स्नेहाची भावना निर्माण होण्याची शक्‍यता फारच कमी, उत्तररामचरितांतीळ ळवाच्या बाबतींत ती निमाण झाली, ह्याचे कारण पितृविषयक पूर्वसंस्कारांचा अभाव, त्याच्या जीवनांत त्या क्षणापर्यंत प्रभु रामचंद्र वडिलांच्या भूमिकेत कवी आलेळे नव्हते. मुलांच्या मनांत पित्याविषयीं स्नेहाची ही मनमोकळी भावना निर्माण होणें असंभाव्य असल्याने दुसऱ्या एका साहिल्िकाने ती जबाबदारी

: ग्राप्ते तु षोडशे वर्ष पुत्रे मित्रवदाचरेत्‌ असें म्हणून वडिलांवर सोंपविळी आहे. याहि ठिकाणीं * मित्रवत्‌ ! असा शब्द योजण्यांत ठेखकाळा असेंच सुचवायचे आहे कीं, वडिलांना फार तर ' मित्रवत्‌ ) होतां येईल. प्रत्यक्ष मित्र होतां

शेशवदूत ४९-९-५-९-३-६-४-१-१-९--१-३-३-७ क७कीककककीककीरकककीकीकीकीकीकीकक-कतकककक-----३-७-६-१-१--१-९-३-३-$ द्र

येणार नाहीं. मात्र प्रत्यक्ष मित्र होतां येत नसतांहि ' मित्रवत्‌ ! तरी व्हायळा सांगण्यात ळेखकाने एक प्रकारे मानवी भावजीवनांतीळ मित्राचे अपरिहायेत्वच मान्य केळे आहे.

मानवी भावजीवनांत प्रीति आणि भक्ति ह्या भावनांना जें असाधारण स्थान आणि माहात्म्य आहे तेच असाधारण स्थान मैत्रीलाहि आहे, ह्याची उत्कट जाणीव ज्ञानियांच्या राजाळा--- ज्ञानेश्वरांनाहि होती. नुसती उत्कट जाणीव होती एवढेच नव्हे, तर जीवनांतील सूक्ष्म भावनांचा शोव आणि बोव घेऊन त्यांनीं मित्र- कल्पनेचे तत्त्वज्ञानहि अति रसाळपणे मांडळे आणि नामदेवाशीं मैत्री करून आचरणांतहि आणले, जीवनांत मित्राची गरज कां निर्माण होते ? आई, बाप, भाऊ, बहीण इल्यादि रक्तसिद्ध नाते- वाईक मंडळींत मित्राचे स्थान काय : त्या मित्रासाठीं माणूस काय काय करण्यास तयार होतो £ इत्यादि मूळभूत समस्यांची उकल ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण आणि अजुन ह्यांच्या एकमेकांतील संबंधाच्या स्वरूपाधारें प्रत्ययकारकतेने केळी आहे. ज्ञानेश्वरींतील श्रीकृष्ण आणि अजुन ह्यांच्या संबादांतन एक गोष्ट वारंबार प्रत्ययास येते कीं, ते दोघेहि अशा एका अमर्याद मोकळेपणानें बोलत आहेत कीं, ते मोकळेपणा-चे, निःसंकोचपणार्‍चे वतैन केवळ दोन जिवलग मित्रां- मध्येंच आढळेळ, ज्ञानेश्वरांनाहि तो मित्रसंबंधच अभिप्रेत होता. एवढेंच नव्हे तर श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत जी नवविधा भाक्ति आहे, त्यांपैकीं आत्मनिवेदनाच्या अलीकडची जी सख्य ! नांवाची आठवी भक्ति आहे, त्या ठिकाणची अर्जुन हीच मुळीं मुख्य देवता होती; मैत्रीचे तो घरच होता, असेंहि त्यांनीं स्पष्टपणे म्हटळें आहे.

दी.५

च्छ ध्द 4-२-९५--५-१-५१५-१५१-५-५-५-११-३-१-१-५-१-१-१-१-१-५-१-२-१५९५-१५१-५--५-५५-१५--१-५-१-५५३-२५५११५-५१-५१-१५-५-५१५--१५-५५३--५ शरावदूत

म्हणऊाने भावार्थ तो ऐसा

अजुन मेत्रियेचा कुवासा

कीं सुखे शुंगाराठिया मानसा

दुपेणु तो

हो का भात्मनिवेदनातळींची

जे पीठिका होय सख्याची

पार्थु अधिष्ठात्री तेथींची

मातृका गा

एकूण महाभारतांतच ह्या मैत्रीसंबंधाचे धागेदोरे आढळतात, परंतु श्रीकृष्णाला अजुन हा मैत्रीच्याच नात्याने कां हवा दोता, ह्याची ज्ञानेश्वरांनी जी कारणमीमांसा केली आहे, तो मात्र ज्ञानेश्वरांच्या स्वयंभू प्रातिभेचा एक अभिनव विलास आहे, मेत्रीवरील ती एक प्रकारे रसाळ घटना * ( ठळछडपपप्ला ) आहे, ज्ञानेश्वरीत जीं अनेक हृदयंगम विषयांतर आहेत, त्यांमध्ये अतिशय रसोत्कट असं हे विषयांतर आहे. गीतेच्या सहाव्या अध्यायांतील ' योगी युंजीत सततम्‌.... ' ह्या

दहाव्या छोकावर टीका करतांना साधंचीं लक्षणें सांगून झाल्यावर ज्ञानेश्वरमहाराज अतिशय सहजतेने तीं सर्वे लक्षणे ज्याच्या अगीं प्राथम्यानें आणि प्रकर्षाने वास करतात, त्या श्रीकृष्णपरमात्म्याविषयीं गाहेंवरून येऊन बोळूं लागतात, हे विषयांतर चाळू असतांनाच आपणांस त्याचा यत्किचिताहि सुगावा लागूं नये, ह्या आविभोवांत ज्ञानेश्वर म्हणतात कीं, श्रीकृष्णांनी अजुंनाला ब्रह्माबद्या उघड उघड कां सांगितली नाहीं £ साधूंचीं लक्षणे सांगण्याची आडवाट कां पत्करली £ अजुनाला आत्मज्ञान करवून देऊन स्वरूपांत विलीन करण्याचे कां टाळले ह्या प्रश्नांची उत्तरोहे ज्ञानेश्वरमहाराजच देतात.

शे दोशवदूत द्७

आणि तीं उत्तरें तार्विक पातळीवरून रुक्षपणें देतां ज्ञानेश्वर मानवी भावनांचा मागावा घेत तुमच्या-आमच्या मूक भावनिक गरजांना वाचा फोडतात. तुम्हां-आम्हांळा मित्राची गरज कोणकोणत्या क्षणीं भासते आपल्या जीवनांताहे कधीं कधीं आत्माविष्काराची गरज निमाण होते. कांहीं दिव्य आनंदाने मन भरून येते. त्या आनंदांत दुसऱ्याळा सहभागी करून घेतल्याशिवाय त्या आनंदाला जणुं कांहीं परणेत्वच येऊं शकत नाहीं. म्हणूनच कुणाशी तरी तोंड भरून बोलावेसे वाटते. आणि ' तो कुणी तरी ' कसा हवा ? तर ज्याच्याकडे पाहून दृष्टि निवावी, ज्याला आलिंगन द्यावेसे वाटावे, ज्याच्या अभावीं जीवनांत एकट्याने जगायचे तरी कशाला, असा प्रश्न निमाण व्हावा. असा प्रश्न निमाण होऊं नये म्हणूनच वरील सवे गरजा भागाविणारा मित्र आपल्या आयुष्यांत अपरिहाये स्थान मिळवून बसतो. ज्ञानेश्वरांच्या मतं श्रीकृष्णाच्या जीवनांत अर्जुनाला : त्या मित्राचे ! स्थान ठाभळे होतं. म्हणूनच श्रीकृष्ण त्याला ब्रह्म- ज्ञान उघड करीत नाहींत. एक पातळसा आडपडदा शिलुक ठेवतात. कारण---

विपार्य भहंभाव ययाचा जाईल मी तैचि हा जरि होईल

तरि मग काय कीजेल

एकलेया ।।

दिठीचि पाहतां निविजे। कां तोड भरोनि बोलिजे नातरी दाटूनि खेंव दीजे ऐसे कवण आहे

दट "१५-१-५६-१९१५-६-१-९३-९-१-१-३--९-५--५६५-९-९-१-९-४१-१-७-१-९-३-३-९३-१-५९-७-९-७-६-६--७३-३-३-६-३-६-३---९-३५-६-९-३-७३-३-९-३-4-३ शदावदूत

ज्ञापुलिया मना बरवी

असमाई गोडी जीवि

ते कवणेसी चावळावी

जरी ऐक्य जाहलें

असा मित्र आयुष्यांत लाभला म्हणजे मग त्याच्या प्रेयस्कारक तथा श्रेयस्कर गोष्टींसाठी कायावाचामने कष्ट उपसण्यांत श्रम होतां अंगावर मूठभर मांस चढल्याचे समाधान होते. ह्या समावानाचीं प्रसाद्चिन्हे ज्ञानेश्वरांना श्रीकृष्ण-पांडवांच्या सहवासांत ठायीं ठायीं आढळळलीं. एखादा मुलगा स्वतःच्या घरीं कदाचित्‌ काम करणार नाहीं. परंतु मित्राच्या घरीं मात्र तो जमीन झाडण्यासहि मागेपुढे पाहणार नाहीं. ह्या मैत्रीच्या दिव्य स्पशोने श्रीकृष्ण पांडवांघरीं अंतर्बोद्य बदळून जात असे. म्हणूनच पांडवांच्या घरीं राजसूय यज्ञांत उष्ट्या पत्रावळी उचलण्यांत ल्याला ळाज वाटली नाहीं ; घोड्यांना खरारा करण्यांत त्याने कमीपणा मानला नाहीं. आपल्या आवडल्या अजुंनासाठीं सुभद्राहरणाचा डाव तर त्यानें यशस्वी केलाच, परंतु मित्रपुत्र अभिमन्यूसाठीं मायाबाजार निमून वत्सलाहरणाहे घडवून आणले. इतकेच नव्हे तर आपल्या प्रिय अजुनाच्या प्राणरक्षणाकरितां म्रसंगीं त्यानें धरीं शास्र करीं मी.... ? ही प्रतिज्ञासुद्धां झुगारून देऊन हातीं शास्र धारण केलें महाभारतांतील ह्या अनेकविध प्रसंगांतील सूक्ष्म सौदयानें

ज्ञानेश्वरांना स्पर्श केला, त्यांना त्या सर्वे प्रसंगांतून श्राकृष्ण-अर्जुन मैत्रीचेच उत्कट दर्शन घडलें. आणि म्हणूनच त्यांनीं अजुनाळा भक्तीच्या इतर प्रकारांत घालतां त्याळा ' मैत्रियेचा कुबासा ) ही पदवी दिली,

शेशवदूत 4-३-९-१-१-१५-९-५-१-५१-१५-१-१-१ २-१--५-५-१-१-५३-१-१-१-५-५१-१-५-५-५-१-५-१-१-५-५-१-१-१-२५-१-१३-१-१-१-१-१-१-१-१-५-१-१-५-१-१-१-१-५-१-१-५-७ द९

ज्ञानेश्वरांनी गीतेच्या ज्या अनेक भागांवर आपला प्रतिभाप्रकाश

टाकून त्यांतील सुप्त सौदर्याचे आल्हाददायक दर्शन घडविठें, त्यांपैकीं श्रीकृष्ण-अजुंन संबंध हा एक हृद्य भाग होय. त्यांना अजुनाळा लाभलेले हे मित्र होण्याचे भाग्य परम वाटतें. मित्र होण्याचें हे भाग्य ज्याळा लाभळें, त्याळा नातेवाइकांपेक्षां जास्त महत्त्व कसे येते, होह ज्ञानेश्वरांनी रसाळपणे वर्णिळे आहे, म्हणूनच ते म्हणतात :

देवकी उदरीं वाहेला

यक्लोदा सायास पाळिला

शेखी उपेगा गेला

पांडवांसीं

किंबहुना बहुदिवस भोळगावा

किं अवसरुं पाहोनि विनवावा

हाहि सोसु तया सदेवा

पडोचि ना पताका पत्नी कितीहि प्रिय असली तरी तिळाहि आपल्या इप्सिता- साठीं पतीचा कल हेरावा लागतो. परंतु अजुन मित्र झाल्यानं त्याला ते पथ्यहि पाळण्याचे कधीं कारण पडलें नाहीं. ज्ञानेश्वरींत ह्या मित्रवयो 'ने किती तरी वेळां उतावळेपणाने श्रीकृष्णाला शंकाकुशंका विचारल्या आहेत, परंतु ' काय हें उच्छंखळ बोलणे ! एवढेंच हंसून बोढून श्रीकृष्ण त्याचे यथास्थित समाधान करतो. ह्या मित्रप्रेमामुळेच युद्ध- क्षेत्रासारख्या अशान्त स्थानीं अर्जुनाला गीतोपदेशाचा निवान्त समयीं करावयाचा वेदान्त सांगावयाला श्रीकृष्णाला वावगे वाटत नाहीं; लोक काय म्हणतील ह्याचा विचार पडला नाहीं. कारण ज्ञानेश्वरांच्या

१७ **५॥॥-॥-५॥॥॥५॥॥॥५॥५॥५०५५॥॥॥॥५१५५५॥५॥॥५५५॥॥०५५॥५५॥५॥१५१५१५५॥-॥०५॥००१५०५॥॥०॥००-०---“““* शेशवदृत

मते मित्राला सहाय्य करण्याचे ठरल्यावर ह्या लौकिक लाजळज्जेच्या बाबी अप्रस्तुत ठरतात, कारण---

पाहा पां नवल केलें चोज के उपदेश केउतें झुंज परि पुढं वालभार्चे भोज नाचत असे

आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी

पिसे आणि भलवी तरी त॑ काई

अपवादाचा बोधिवृक्ष

रूढार्थातीळ शाळेय जीवन जेव्हां संपले, तेव्हां झालेल्या दुःखांत अभ्यासांतील कांहीं किचकट गोष्टींच्या कचाट्यांतू़ सुटल्याबद्दलचचा एक सूक्ष्म आनंदाहे होता. त्या अनेक किचकट गोष्टींत जशीं नदीकांठावरील गांवें होतीं, कुप्रसिद्ध लढायांचे सन होते, तशींच किंबहुना अधिक त्रासदायक होतीं तीं व्याकरणांतीळ अपवादाचीं उदाहरणें. शाळेंत असतांना व्याकरणाचे नियम पाठ करीत यावें यावे, तोंच अपवादाच्या उपटसुंभाचा आदरसत्कार करण्याची आपत्ति येऊन कोसळत असे. बरें तीं केव्हां, कशीं आणि कोठें उगवतील, याळा कांहींच धरबंद नसल्यानें, त्यांच्या त्या गनिमी काव्याने मी तेव्हां अक्षरशः मेटाकुटीस येत असे. मुख्य सैन्यापे्षां बाजार- जुणग्यांना सांभाळणें जसे सेनापतीच्या जिवावर यावें, तसें मला गळ्थानपणे वावरणाऱ्या अपवादांची व्यवस्था ठेवतांना त्राहि भगवन्‌

क्क ९9० -३-१-१-९-६-३-९-६-१-६-६-१-३-६-१-७-$---६--७--१-७-$-१-३-७-६-९-६-$-९-१-७-१-६-१-$--१-१-१--$-९-९-१-३-९-९-९-६-१-९-६-३-९-३-३-३-९-$-$-३-३-३ शरावदूत

होत असे. नियमांच्या सर्वे-संग्राहक तंबूंतन बाहेर पडून खतःची खतंत्र राहुटी ठोकणाऱ्या त्या अपवादांची नोंद करतांना मी फारच गोधळ करीत असें. त्या अपवादांनीं स्वतःचे इतके स्तोम माजवून ठेवळे होतें कीं, बिचाऱ्या नियमांचे अस्तित्व त्या अपवादांकरितांच आहे कीं काय, इथपर्यंत मजळ आली होती. आगि म्हणूनच : अपवादांनीं नियम सिद्ध होतो अशी सनदाहि त्या अपवादांना मिळाळी होती. ' नाकापेक्षां मोती जड? अशा त्या अपवादांवर म्हणूनच माझें मन नेहमीं रुष्ट असे.

परंतु शाळेंतळे व्याकरण जाऊन जेव्हां प्रत्यक्ष जीवनाच्या व्याकरणाचे विश्वरूप-दरीन घडळे, तेव्हां मीं स्वतःच अपवादाचें निशाण उभारले ! दुधाच्या हंड्यांतीलठ मिठाच्या खड्याप्रमाणें वाटणारा व्याकरणांतीळ अपवाद जीवनांत मात्र रूढ नीतिनियमांच्या सांवटांतीळ प्रकाशस्थळाग्रमाणे वाटला, व्याकरणांतील अपवादांची दृष्टि चुकविणारा मी आतां जीवनांत मात्र अपवादाचीच कांस धरूं लागलो.

ह्या नव्याने झालेल्या अपवादाच्या साक्षात्कारानेंच माझ्या अंगीं एक नवें सामथ्ये आणले. पारंपरिक पुनरावृत्तीच्या धसक्याने मरगळलेल्या माझ्या वृत्तींतत जीवनरस खळखळून वाहे लागला, मनीं योजलेल्या आकांक्षेची शिडे तरारून उभी राहिली. त्या नब्या अपवाद -प्रकाशांत सुखाची माधुरी कलात्मक अलेप्ततेने ! "चाखली आणि दुःखांची कटुता क्रीडापट्टूच्या खेळकरपणानें हंसत झेळळली, जीवनांतील समस्यांना सगेसोयऱ्यांनीं सांगितठेलीं लब्घ- प्रतिष्ठित परंतु कागदी उत्तरे देतां त्या समस्यांना अनुभवाच्या

शेशववूत 4२*१-*4-*-९-२.१-१-१-०२-९९-०-०-५१-१-१-२-५-५१.१-५-०१५-९१-१-१५१-११-१०-५२१-१९५-१५५५१-१२-९५१५-१-१-५-१५०-१५-९-९५-५-१५९५१-१५-१-७ ष्ठ

क्षेत्रांत रुजवून चितनमननाचे खतपाणी घातलठें, तेव्हां कुर्ठे त्या समस्यांना रसरसलेल्या जिवंत उत्तराचीं फुले येऊ लागलीं.

मला तर वाटते, माणसाच्या ऐहिक पारलौकिक जीवनांतील दुलभ साध्ये केवळ ह्या अपवादाच्या साक्षात्कारानेंच दृष्टिपथांत येतात आणि कालांतराने आत्मसात हातात, अपवादाच्या साक्षा- त्काराची वैजयंतीमाळ आपल्या गळ्यांत पडावी, अशी प्रच्छन आज्या ग्रत्येकाळाच असते. मात्र अपवादाचे जीवन ही एक तपस्या असल्यानें त्याचें फळ रूढ नीतिनियमांच्या शाळेंतीळ मासिक पगाराप्रमारणे महिन्याच्या एक तारखेला मिळत नाहीं. परंतु ज्या क्षणीं तो आपल्या शिरपेंचांत अपवादाचा तुरा खोवतो, त्या वेळेपासूनच त्याच्या सुख- दुःखाचे अर्थे बदलतात.

असा हा अपवादवादी माणूस व्यक्ति-खातंत्र्याादी असतो, व्यक्तिवैरिष्ट्यवादी असतो. नियमांचा प्रूवग्रहदूध्रेत चष्मा डोळ्यांवर नसल्यानें तो दुसऱ्याच्या जीवनाकडे समजूतदारपणे पाहतो. मला तर असें वाटतें कीं, प्र्येक अपवादवादी माणूस हा अध्यात्मवादी असतो आणि म्हणूनच अध्यात्मक्षेत्राप्रमाणेंचे अपवादवाद्यांच्या विश्वांत पुढच्यास ठेंच मागचा शहाणा! ह्या नियमांतील परोपजीवी बृत्तीस स्थान नसतें. तेर्थे प्रत्येकास स्वतंत्र रीत्या अनुभव घ्यावा लागतो; इतकेंच नव्हे तर त्या अनुभवांतील प्रत्येक दिवस हा नित्य नवा असतो. जो ' आत्मप्रभा नीच नवी तेचि करूनें ठाणदिंवी ! वागेल त्यालाच आत्मज्ञानाचा लाभ घडतो, अर्से जें ज्ञानेश्वरांनी म्हटलें आहे, ते म्हणणेच मुळीं अपवादवादी जीवनाचे मूल्य असतें.

| र््$ “४ ४२-*२-९१-९९-१-१-२-१-९९१-५-१-१-५ १-९ ९-१-२-०-५-९-१-९-१-१-१-१-९-१-९-१-३-१-१-१-१-१-१-५-१-६-५-१-१-१-१-१-१-१-१-९-१-५-१-२--१-१-१-५-१ शशवदूत

ह्या अपवादाच्या साक्षात्कारामुळेच प्रेमकवींचा कधीं अस्त होत नाही, होणार नाहीं, प्रत्येक प्रेमकवीळा आपली प्रीतिविषयक अनुभूति ही अपवादभूत वाटत असते. म्हणूनच ता त्या अनुभूतीळा बाव्यरूप देण्याचा प्रयत्न करतो. मळा तर वाटते कीं, प्रत्येक

कलावंताच्या जीवनाची सुरवातच मुळीं अपवादाच्या साक्षात्कार -

बिंदूपासन होते. एका डॉक्‍्टरसारखा दुसरा डॅक्टिंर होऊं शकतो म्हणून डेक्‍्टरकीच्या शाळा निवूं शकतात. परंतु कलावतांनीं मात्र झाळे'े हे सांबट स्वप्नांतदेखीळ पाहिलेले नसते. एका कलावंता- पेक्षां दुसरा कठावत भिन्न असतो, याचे कारण प्रत्येकाच्या हृदयां- तीळ अपवादाचा साक्षात्कार !

ज्या प्रमाणांत ह्या अपवादाच्या साक्षात्काराची तीव्रता कमी- अविक असेल, त्या प्रमाणांत तो माणूस रसरसळेळे जीवन जगून जातो, कधीं कधीं तुकोबासारख्या माणसांना हा साक्षात्कार ' एका- एकीं आतां तुका लौकिका या बाहेरी ! असे जाणवून होतो, तर कीं कधीं त्या अपवादाचे सम्यक्‌ दर्शन झाल्याने कुणी अध्या रस्त्यावरूनच परत फिरतात, अपवादाच्या साक्षात्काराशीं नुकतीच ओळख पट॑ं लागलेल्या, वसत बापटांच्या कवितेतील नायकाला अशा वेळी, तपाचरण करणाऱ्या मुनीळ| इंद्राच्या अप्सरांनीं परावृत्त करावें त्याप्रमाणे---

सगेसोयरे सांगति तेव्हां व्यवहाराची रीत कोणि म्हणाळे परत मागुती प्रीत असे विपरीत.

आणि तोहि बिचारा अनवधानाने परत फिरतो आणि मग

आयुष्यभर ' सुखसंसारीं ! रडत बसतो.

शरावदूत *4*-२-4-२-५३-१-९-३-५१-१-५१-०-९-२-१-५-१-१-१-१-९-५-१२-९-१-१-१-६-१-५-९-३-१-२-०-१-१-६-९-१-१-९-५-५-१.५१-२-२-५-५-९-५.५.३-१-९.२.३.३.२-२.१५-१०.२.०२.० ७७१३

मळा तर असे वाटते कीं, अपवाद ' हाच सृषप्टिक्रमाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच एका सूर्योदयासारखा दुसरा सूर्योदय नसतो. प्रत्येकाचे सोदये हे व्यवच्छेदक असंत. नेमेचि येणारा पावसाळा प्रत्येक वर्षी वेगळा असतो म्हणूनच त्याच्या सौदर्यांची नित्य नवी मोहिनी पडत असते. ऑक्टोबरांतीळ सायंकाळचे मेघाकृतीं- वरीळ रंगसोदरय प्रत्येक दिवशीं नवनवोन्मेषशाळी असतें, म्हणूनच त्याच्या दरोनासाठीं बदामी डोळे रोजच आतुर होतात. ह्याच अथोने एका माणसासारखा दुसरा माणूस वाच्याथाने असला तरी लक्ष्यायीने कधींहि नसतो आणि म्हणन एकाला दुसऱ्याच्या जीवना- विषयीं कुतहूळ वाटते, त्या कतहुलापोटींच तीं एकमेकांना समजून घेतात, तेवढ्यासांठींच समाज बनतो. परंतु तो एकखांबी तंबूसारखा नव्हे, तर अनेकविध स्वतंत्र राहुट्यांचा !

कलावंताला शैदवावावांचून दुसर॑ वय नसते. तुमच्या-आमच्या जरठ जीवनात तो शेशवबदूत होऊन येतो आणि आपल्या दोौदावदृष्टीर्ने जीवनातील सौंदर्याची पुर्ष्ये बेंचतो, तीं कलेच्या सूत्रात माळतो आणि अव्याज स्नेहाने रसिकांना सादर करतो. श्री. देवीदास बायूल यांच्या शेशवदूत ' या ललितनिबंध - संग्रहांत कलाकाराची हीच दोशव - वृत्ति उत्कटतेने प्रकटली आहे.